पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटा.

८५


जर चांदी खरेदी करण्यांत आली - व अशी चांदी येथेंच खरेदी करा असे म्हणण्याचा हिंदुस्थानच्या लोकांस इक आहे, कारण ही चांदी हिंदुस्थान- करितां हिंदुस्थानचेच खर्चाने खरेदी करावयाची आहे–तर येथील धंद्याला चांगले उत्तेजन येण्याचा संभव आहे. पण स्टेट सेक्रेटरीला विलायतेच्या व्यापायांबद्दल, उदाहरणार्थ माँटेग्यु कंपनीबद्दल, सहानुभूति वाटत असून त्या चांदी खरेदीप्रीत्यर्थ होणारा नफा परदेशच्या व्यापायांच्या हातांत पडत आहे. ही झाली चांदीची गोष्ट. पण ह्या निधीमध्ये जे सोनें सांठविण्यांत येतें तें विला+ यतेंत कां ठेवण्यांत यावे हे समजणे मुष्किल आहे. * शिवाय हे जे सोनें विला- यतेंत का होईना, ठेवण्यांत येतें त्याचा मुख्य उपयोग असा आहे की, ज्यावेळी हूंडणावळीच्या भावांत गडबड होईल त्यावेळी तो कायम ठेवण्यास सरकारास नोटांऐवजों रुपये देण्याचा प्रसंग आला असतांना हें सोनें उपयोगांत आणावयाचें. पण मौज अशी आहे की, स्टेट सेक्रेटरी आपल्या मर्जीप्रमाणे ह्या राखून ठेव- लेल्या सोन्याचा उपयोग करीत असतो. तसेंच हैं सोनें वास्तविक स्टेट सेक्रेटरीनें बँक ऑफ इंग्लंडजवळ ठेवून तिला त्या सोन्याचा इतरत्र कशाही तऱ्हेनें उपयोग करूं देता कामा नये. पण त्या सोन्याचा उपयोग होतो इंग्लंडमधील समवायिक भांडवल असलेल्या पेढ्यांना आणि जेव्हां स्टेट सेक्रेटरीला खरोखरच त्यांची जरूर पडते त्या वेळी ह्या सोन्याचा त्याला उपयोग होत नाहीं. कारण तें सोनें त्या पेढ्यांनी व्यापारांत गुंतविलें असतें. अशी या पेपर करन्सी रिझर्व्ह ची मनोरंजक हकीगत आहे.

 (५१ ) चेंबरलेन कमिशनच्या सूचना:- ह्या चलनी नोटां- संबंधाने चैबरलेन कमिशननें कांही सूचना केल्या त्या अशः -

 (१) हा चलनी नोटाप्रीत्यर्थ राखून ठेवलेला निंधि जास्त लवचिक असावा म्हणजे चलनी नोटांच्या मोबदला ठेवलेल्या रकमेतून तूर्त २० कोटींपर्यंतच्या रुपयांचे रोखे घ्यावे. यापुढे जेवढया चलनी


  • हल्लीं हैं सोनें ठेवण्याची चाल बंद झाली आहे.