पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटा.

८३


चलनी नोटाचें आफीस आपल्या निरनिराळ्या मुख्य ठिकाणांतून करण्याचा संभव आहे.

 (४९) चलनी नोटांचा महायुद्धापर्यंतचा इतिहास: हिंदुस्थानांत चलनी नोटांचा प्रसार हळू हळू सुरू झाला. वर सांगण्यांत आले- लेच आहे कीं, चलनी नोटा सुरू करतांना ४ कोटी किंमतीचे तारण रोखे घेऊन ठेवण्यात यावे. पुढे ही रोख्यांची किंमत वाढून १९११ साली १४ कोटींपर्यंत गेली व त्या १४ कोटींपैकी ४ कोटींचे तारण रोखे हिंदुस्तान सरकारच्या तारण रोख्यांव्यतिरिक्त असावेत, असें ठरले. त्याचप्रमाणें चलनी नोटांचा प्रसार ४० कोटीनों वाढला. १९०५ सालीं एक महत्वाची गोष्ट घडून आली. ती ही कों, लंडन शहरीं ह्या चलनी नोटांच्या निधीची एक शाखा उघडण्यांत आली व हळूहळू १० रुपयांहून कमी किंमतीच्या नोटांचा म्हणजे एक रुपया किंमतीच्यासुद्धा नोटांच सार्वत्रिक प्रसार करण्यांत आला. त्याचप्रमाणे ह्या काळांत ह्या चलनी नोटा- करता राखून ठेवलेल्या निर्धीत १८९८ साली हिंदुस्थानांत व १९०६ साली लंडन शहरों सोनें ठेवण्यांत येऊं लागलें व सोन्याचे नाणे किंवा सोनें ह्याच्या बदली वाटेल तेवढ्या रकमेच्या नोटा देण्यांत येऊं लागल्या. १८९८ साली एक 'गोल्ड नोट' नावांचा कायदा पास करण्यांत आला. त्या कायद्यान्वयें विला. यतेंत जे सोनें राखून ठेवले असतें त्यावर हिंदुस्थानांत नोटा देणे सुरू कर भ्यांत आले; त्यामुळे पैसाची चणचण जरा कमी भासूं लागली. तसेंच कल- कत्ता, मुंबई, मद्रास, रंगून, कराची, कानपूर व लाहोर त्याच शहरांत नोटा देण्याचें कायद्यानें ठरले. पूर्वी फक्त कलकत्ता, मद्रास व मुंबई त्या तोनच शहरांतून लोकांस नोटा मिळत. तबेंच बीस रुपयांची नोट रद्द करण्यांत येऊन १९११ साली १०० रुपयांची नोट सार्वत्रिक ( म्हणजे सर्व देशमर चालणारी ) करण्यांत आली.

 वर सांगण्यात आलेच आहे कीं, १८९८ साली 'गोल्ड नोट' नांवाचा कायदा पास रण्यांत आला. हा कायदा खरोखर तात्पुरता असून कांही विशिष्ठ शेरीस्थतामुळे त्याची जरूर भासली. ही परिस्थिति अशी होती की, "स्टेट