पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
भारतीय चलनपद्धति.

या वेळी जी पद्धति सुरू करण्यांत आली तीच पद्धति सुमारें ५० वर्षेपर्यंत टिकली. ह्या नोटा जेव्हा जेव्हां प्रवारांत आणावयाच्या असतील तेव्हां तेव्हा त्या नोटांच्या बदली सरकारने सुरू केलेले रुपये किंवा उत्तम चांदी किंवा जर परदेशची नाणी असतील तर नाणे पाडण्यास उपयोगी अशा १००० तोळ्यांबद्दल ९७९ रुथ्ये या दराने तीं परदेशची नाणी ठेवण्यांत यावीत; त्याचप्रमाणें चांदीच्या ऐवज हिंदु- स्थानांतलें किंवा परदेशचें जर सोने किंवा सोन्याची नाणी असतील तर त्यांच्या आधारावर जाहीरनामा काढल्यावर नोटा सुरू करण्यात याव्या असें ठरलें त्याच- प्रमाणें नोटा सुरू करण्याचे काम प्रेसिडेन्सी बँकेचा उपयोग करण्यात यावा. म्हणजे त्याच कामाकरितां आणखी निराळी ठिकाणे ठरवावयाला नकोत, व त्या त्यांच्या कामाबद्दल त्यांना दरसाल दर शेकडा १ रुपया क मिशन म्हणून देण्यात यावे असें प्रथम स्टेट सेक्रेटरी विरुद्ध होता तरी, ठरविण्यात आलें. पण १८६२ सालीं स्टेट सेक्रेटरीनें एक स्पष्ट हुकूम हिंदु- स्तान सरकारास दिला व त्या सरकारास अर्से कळविले की, वर्तमान परिस्थिति न बदलतां होती होईल तो चलनी नोटांच्या खात्याच्या नोटा प्रचलित करण्याचे बाबतीत पेढ्यांशी बिलकूल संबंध असूं नये. कारण ह्या पेढ्यांची प्रवृत्ते. नोटांचा प्रसार लोकांत करवून आपल्याजवळ असलेली चांदी काढून टाकण्याकडे होईल व शक्य तितका नोटांबद्दल रुपये न देण्याचा त्या पेढ्या प्रयत्न करतील. प्रेसिडेन्सी बँकांना सुद्धां हे म्हणणे पटून त्यांनी आपला संबंध त्या चलने नोटांच्या खात्याशी तोडून टाकिला.

 ह्या चलनी नोटांच्या प्रचारामुळे दुसरा एक मजेदार परिणाम झाला. त्या नोटा सुरू करण्यांत मूळ हेतू असा होता कीं, लोकांना एक स्वस्त व सोयीची चलनपद्धति मिळावी. पण पुढे पुढे असा परिणाम होण्याचा संभव दिसूं लागला की, ज्या वेळी देशांत पैसा भरपूर असेल त्या वेळी ह्या चलनी नोटांच्या साहाय्याने फाजील पैसा काढून घ्यावयाचा व ज्या वेळी त्याची चणचण असेल त्या वेळी तो पुनः सुरू करावयाचा. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे पश्चिम युरोपकरितां बँक ऑफ इंग्लंड जी कामगिरी करून राहिली आहे तीच कामागेरी हेंच