पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
भारतीय चलनपद्धति.

हाती घेतला. ह्यावेळी इंग्लंडमध्ये ह्या चलनी नोटांच्या प्रश्नाबद्दल दोन मतें प्रचलित होती. एक मत असें होतें कीं, नोटा जर प्रचालित केल्या तर त्यांबद्दल त्या नोटा घेणारांस केव्हांही नाणे मिळू नये व दुसरें मत असे होते की, जेव्हां नोटा प्रचलित करण्यांत येतात तेव्हां त्यांबद्दल लोकांस जर नेहमीं नाणे मिळेल तरच त्या प्रचलित कराव्यात. ह्या दुसन्या मताचा पुरस्कर्ता वुइल्सनसाहेब होता. ह्या दुसऱ्या मताच्या पुनः दोन शाखा होत्या. एका शाखेचें असें मत असे की, जितक्या किंमतीच्या नोटा लोकांत सुरू करण्यांत येतात तितक्याच किमतीचें सोनें किंवा नाणीं खजिन्यांत बाजूला काढून ठेवलेली पाहिजेत. मात्र एक ठराविक संख्येपर्यंत ज्या नोटा काढावयाच्या त्याच्याबदली ह्या सोन्याची जरूर नाहीं. ही संख्या कोणती हें मात्र अनुभवानें ठरविलें पाहिजे. दुसन्या शाखेचें मत असें होतं की, ही अट असण्याचे कांहीं कारण नाहीं; कारण ज्या अर्थी नोटांबद्दल आपण नाणे देण्यास तयार आहों त्याअर्थी त्या नोटा फाजील प्रमाणांत सुरू होणे अशक्य आहे व जेव्हां जेव्हां नोटा काढावयाच्या असतील त्या त्यावेळी कांही ठराविक रोकड किंवा तारण रोखे बँकांनी किंवा सरकारने काढून ठेवावे असा जर कायदा केला तर नोटांबद्दल नाणे देणे केव्हाही शवय होईल.

 (४७) वुइल्सन साहेबाची सूचनाः- वुइल्सन साहेबाचें मत अशाच प्रकारचें होतें. त्याने हिंदुस्तानांत आल्यावर स्टेट सेक्रेटरीला लिहिलेल्या एका खलित्यांत अशी सूचना केली कीं, ह्या देशांत चलनी नोटांचा प्रसार विस्तृत प्रमाणांत सुरू करण्यांत यावा व जितक्या किंमतीच्या नोटा असतील त्या किंमतीच्या १/३ किंमतीचे नाणे अलग ठेवण्यांत यावें व बाकीच्या २/३ किंम- तीचे तारण रोखे ( Government securities ) ठेवण्यांत यावे म्हणजे त्या रोख्यांवर व्याज मिळेल. हिंदुस्तानचे ४० किंवा ५० विभाग कल्पिण्यांत यावे व जो कोणी नोटा घेऊन येईल त्याला ह्या विभागाच्या ठिकाणी किंवा इलाख्याच्या राजधानीचे ठिकाण नोटाबद्दल रुपये देण्यांत यावेत. तसेंच एक मोठें खातें निर्माण करण्यांत यावें व ह्या खात्याचा संबंध टांकसाळ व तिचे