पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
भारतीय चलनपद्धति.

तीन शहरांपुरताच असे. अर्थात ह्या पेढ्यांच्या नोटांना कायदेशीर नाणे अशी संज्ञा देगें शक्य नव्हते.

 बँक अफ् बेंगाल ह्या पेढीचें अस्तित्व १८०३ सालापासून आहे. ह्या पेढीला मिळालेल्या सनदेनें १० रुपयांपासून १०,००० रुपयांपर्यंत किंम तीच्या नोटा काढण्याचा अधिकार तिन मिळला. ह्या पेढीनें किती किंमतीच्या नोटा काढाव्यात ह्याबद्दल उष्ट निर्बंध नव्हता. पण सरक रच्या दोन अटी अशा होत्या कीं, पेढीचे जे ५० लाखांचे भांडवल आहे त्याहून जास्त रकमेच्या नोटा काढण्यांत येऊं नयेत व जितक्या किमतीच्या नोटा काढलेल्या असतील त्याची नगद ठेवलेली असली पाहिजे. पुढे बँकेचा व्यवहार वाढल्यावर- ही नोटांच्या किंमतीची ही संख्या दोन कोटीपर्यंत गेली.

 ह्या पेढीच्या नोटांचा फारसा प्रचार न होण्यावे असे कारण होते की, ह्या नोटा कायदेशीर नाणे मानले जात नसे व कलकत्त्याच्या बाहेर ह्या नोटांना फार महत्त्व नसे; कारण त्या बाहेर वटविल्या जात नसत. पण पुढे पुढे सरकार • ह्या नोटांचा स्वीकार कलकत्ता व खालचा बंगाल प्रांत ह्या भागांत करूं लागले व सरकारी खजिन्यांत ५० लाखांपर्यंत ह्या नोटा ठेवलेल्या असत. ह्मा पेढीने आपणांस प्रयागेस एक शाखा उघडावयाची आहे तेव्हा आपल्या नोटा त्या वेळेचा वायव्येकडील प्रांत म्हणजे हल्लींच्या संयुक्त प्रांतात असलेल्या खजि न्यांत स्वीकारण्यांत याव्या अशी विनंति सरकारास केली, तीस सरकारने जे उत्तर दिले तें लक्ष्यांत ठेवण्यासारखे होतें. सरकारचे असे म्हणणे होतें कीं, स्वतः काढलेल्या नोटांबद्दल त्याच प्रांतांत पैसे देण्यास जर बँक कबूल असेल तर आपण तिचें म्हणणे कबूल करूं. बँकेला ही गोष्ट ठाऊकच आहे की, ह्या संयुक्त प्रांतांत जी शिल्लक राहते ती कलकत्त्याला व्यापाऱ्यांनी काढलेल्या हुंडच्या द्वारें किफायतीनें आपणांस आणतां येते. ह्या उत्तराचा असा अर्थ होतो कीं, विवक्षित भागांत बँकेच्या नोटा स्वीकारण्याची जरी सरकारची तयारी होती तरी खालच्या बंगाल प्रांतांत त्या नोटांबद्दल रुपये देण्याची किंवा त्या स्वीकारण्याची कबुली असलेल्या लोकांनी मागितल्याखेरीज पुनः त्या काढण्याची त्याची बिलकूल इच्छा नव्हती.