पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटा.

७७


असतात तितक्याच किमतीचें सोने किंवा चांदो कोणी ठेवीत नाहीं. कांहीं देशांत ह्या नोटा सुरू करण्याचा मक्ता कांहीं विविक्षित पेढयांना - उदाहरणार्थ, इंग्लंडमध्यें बँक ऑफ इंग्लंड ह्या पेढीला-दिलेला असतो; वर अमेरिकेसारख्या देशांत वाटेल त्या बँकेनें सरकारने ठरविलेल्या अटो संभाळून ह्या नोटा काढ- ण्याची मुभा असते. वास्तविक पाहिले असतां ज्याअर्थी लोकांच्या विश्वासाचा फायदा घेऊन त्यावर फारसा खर्च न करतां पैसे मिळविण्याचा लोभ कोठ- रुयाही पेढीला होण्याचा संभव असतो, त्याअर्थी सरकारचा ताबा ह्या नोटा काढण्याचे बाबतींत पेढ्यांवर असणे इष्ट आहे. राशयासारख्या देशांत, सरकारीच पेढया असल्यामुळे, असा ताबा असण्याची जरूरी नसते. पण ज्या इंग्लंड, जर्मनी वगैरे देशांत अशा सरकारी पेढ्या नसतात त्या देशांत जन- हिताच्या दृष्टीने असा ताबा असणे अत्यवश्यक असते.

 इतर देशांच्या मानानें व्यापाराचे बाबतींत हिंदुस्थान देश मागसला असल्यामुळे होतां तो होईल तो आपला व्यवहार चलनी नोटांवरच भागवा- वयाचा ही प्रवृत्ति येथे फारशी दिसून येत नाही. त्याच कारणानें कागदाच्या चिठो-यापेक्षां धातूंच्या नाण्याचे महत्व खेडेगांवच्या शेतकऱ्यांांस जास्त वाटतें. ह्या प्रवृत्तीचें मुख्य कारण असे आहे कीं, ह्या कागदी नोटा वापरण्यांत येतांना लवकर फाटण्याचा संभव असतो. त्या मानानें धातूंची नाण हरवल्याशिवाय नाहीशी होण्याचा संभव नाहीं. खरोखर पाहिले तर ह्या लोकांच्या प्रवृत्तीबद्दल त्यांस नांव ठेवणे रास्त होणार नाहीं. हल्लीं रुपयाच्या किंवा अडीच रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या इतक्या लवकर फाटतात की, ह्या नोटांपेक्षां नाणींच बरी असे लोकांस वाटले तर त्यांत त्यांचा कांहीं दोष नाहीं. जसजशी लोकांची औद्योगिक प्रगति होईल व त्यांच्यामध्ये ज्ञानप्रसार होईल तसतसें लोकांचे मन बदलून ह्या नोटांचा जास्त प्रसार होईल.

 १८६१ सालचा कायदा पास होण्यापूर्वी सरकार चलनी नोटा काढत असे. अशा नोटा काढणें हें खाजगी पेढ्यांकडेच सोपविले असे; व ह्या पेढ्या म्हणजे कलकत्ता, मुंबई व मद्रास येथील पेढ्या होत व ह्या नोटांचा प्रसार ह्या

म. द. था. पोतवा