पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
भारतीय चलनपद्धति.

कमी होत चालली आहे. खरोखर हुंडणावळीचा भाव चढल्यानें जर कोणाचा फायदा झालेला असेल तर तो इंप्रेजी व्याप यांचाच होय. कारण ह्यांच्या मालाला युरोप खंडांत युद्धजन्य परिस्थितीमुळे फारशी मागणी नव्हती व एका साव्हरिनला १० रुपये ( पूर्वीचा दर १५ रुपये होता ) हा दर झाल्यावर येथल्या व्यापा-यांनी भराभर मागणीला सुरुवात केली व विलायतच्या पडून तुंबून राहिलेल्या मालास इकडे येण्यास वाट फुटली. कमेटीची सूचना व दलाल ह्यांची सूचना ह्यांचा विचार करतांना 'दगडापेक्षां वोट मऊ या न्यायानें मि. दलालची सूचनाच त्यांतल्यात्यांत बरी होती असे म्हणण्यास हरकत नाहीं.


 (४९) चलनी नोटांचा इतिहासः- चलनी नोटा उपयोगांत येण्याचें मुख्य कारण असें असतें कीं, सोने व चांदीसारख्या धातूंचा उपयोग होतां होईल तो व्यापारामध्ये उपयोग करावयाचा. नाणी पाडण्यांत ह्या धातूंचा उपयोग केल्याने त्यापासून द्रव्योत्पादक असा फायदा होत नाहीं. अशा घोरणाने सरकार व पेढया चलनी नोटांचा प्रसार करीत असतात. जे देश सुधारणेच्या शिखराला पोंचलेले आहेत त्या देशांत लोकांची प्रवृत्ति आपला व्यवहार नुसत्या कागदाच्या चिटोन्यानेंच करण्याकडे होत असते. मग तो चिटोरा सरकारी नोट असो किंवा खासगी पेढयांनी काढलेली बँक नोट किंवा चेक असो. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, ह्या नोटांच्यामागे सोनें किंवा चांदी असते; पण हीही गोष्ठ खरी आहे कीं, जितक्या किंमतीच्या नोटा प्रचारांत