पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

७५


दर ठरविला गेला त्यामुळे रयतेचे फार नुकसान झालेले आहे. रुपयाची व चांदीची जी किंमत वाढली होती ती केवळ आगंतुक कारणामुळे वाढलेली होती. ती तशी रहाणार नाही, पुन: चांदीची किंमत पूर्वस्थितीला येईल ही गोष्ट कमे- टीच्या कानोंकपाळी लोक व कमेटींतलेच एक तज्ज्ञ सभासद मि. दलाल हे ओरडून सांगत होते. मि. दलालचे असे म्हणणें होतें की, हिंदुस्तानांत रुपयाला एवढी मागणी येण्याचे कारण लढाईच्या वेळी विलायत सरकारने हिंदुस्तान सरकारच्यामार्फत जो माल खरेदी केलेला आहे त्या मालाची किंमत हिंदुस्तानांत व्यापायांच्या हाती अजून आलेली नाही. हे होय. हिंदुस्तानचा माल खरेदी केल्याबद्दल बाहेरच्या राष्ट्रांना जें हिंदुस्तानचे कर्ज झालेले आहे ते फेडण्याकरितां त्या राष्ट्रांनी कर्ज काढून किंवा सोने चांदी पाठवून आपली फेड करून घेतली असती. इंग्लंडमध्ये अमेरिकेचा माल आल्यावर त्याच उपायांचा अवलंब करून अमेरिकेनें आपली कर्जाची फेड करून घेतली. पण हे सर्व सोडून ' मुरारेस्तृतीयः पंथा: ' ह्या न्यायाचा आश्रय करून कमेटी कडून हुंडणा- वळीचा भाव चढविला गेला. चांदीची किंमत वाढण्याचें खरें कारण असें होतें की, चांदी सरकार बाहेर जाऊं देईना व हुंडणावळीचा भाव तर वाढलेला; ही चांदीची किंमत फार वाढल्यामुळे इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांत कृत्रिम किंमतीच्या नाण्यांच्या किंमतीला जेव्हां धक्का बसला तेव्हां त्या देशांतील सरकारांनी लहान किंमतीची नाणी काढून किंवा आहेत त्या नाण्यांना होणकस करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तशीच क्लृप्ते येथेंदी करावी व आहेत ते रुपये तसेच ठेऊन नवीन नाणी जीं पाडावयाचीं तो कभी चांदी घालून दोन रुपयांची पाडाव म्हणजे ती लोकांकडून आटली जाणार नाहीत अशी मि. दलाल ह्यांची सूचना होती. ज्या अर्थी रुपया है कृत्रिम न णें आहे त्याअर्थी त्याची किंमत कांहीही ठरवून ती प्रचारांत अणण्यास फारशी हरकत नाहीं. आतां खरें पाहिले असतां अर्शी नाणी सुरू करणे म्हणजे लोकांची फसवणूकच आहे व त्यामुळे जिनसांच्या किंमती फार वाढतात; पण हुंडणावळीचा भाव वाढविगें हेंदी कांहीं सच्चेपणाचें लक्षण नव्हे. असा कृत्रिम भाव व ढविल्यानें हिंदुस्तानांत एकदम विलायती मालाची मागणी वाहून निर्गत मालाची किंमत वाढल्यामुळे त्याला मागणी कमी