पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
भारतीय चलनपद्धति.

आहे त्या अर्थी त्या सोन्याच्या नाण्याबद्दल रुपये देण्याचा सरकारने जिम्मा घेऊं नये, पुढे जेव्हां सुस्थिति येईल तेव्हां सरकारने सोन्याबद्दल रुपये व रुपया- बद्दल सोन्याचें न.र्णे देण्याची व्यवस्था करावी. चांदीची खरेदी मुंबईलाच करावी, म्हणजे सरकार व लोक ह्यांचा फायदा होईल अशी एक सूचना कमिटीसमोर आली होती. पण तिजमुळे विलायते चे व्यापारी ह्यांवें नुकसान होईल अशा भीतीनें ह्या सूचनेस कमिटीकडून वांटण्याच्या अक्षता मिळाल्या. चलनी नोटाकरितां राखून ठेवलेला सुवर्णनिधि व गंगाजळी सोन्याची ठेव त्यांबद्दल कमिटीने मह- त्वाच्या सूचना केल्या; पण पेपरकरन्सी रिझर्व्हबद्दल केलेल्या कांही सूचनांचा विचार पुढे येणार असल्यामुळे येथें फक्त बाकीच्या सुचनांचाव विचर आप- णांस कर्तव्य आहे. त्या सूचना अशा:--

 ज्या अर्थी हुंडणावळीचा भाव वाढणार त्याअर्थी पौंडांच्या किंमतीच्या रोख्यांची ( Sterling Investments ) व गंगाजळीतल्या ठेवीची नवीन किंमत ठरवावी लागणार; व ह्या दोघांचा भाव उतरल्यामुळे जे नुकसान होईल ते नुकसान हिंदुस्तान सरकारला स्टेट सेक्रेटरी कमी रुपये पाठवावे लागणार असल्यामुळे होणा-या फायद्यांतून त्या सरकारनें तें भरून काढावें. लोकांची रास्त मागणी पुरविण्याकरितां प्रेसिडन्सी बँकांना कर्ज म्हणून ५ कोटींच्या नोटा जास्त काढाव्यात; व त्याजबद्दल तारण म्हणून निर्गत मालाबद्दल ज्या हुंड्या असतील त्या द्याव्यात. विलायतेंत जो सुवर्णनिवि ठेवण्यांत येतो त्याबद्दल लोकांची जी तक्रार होती तिची दाद घेऊन अशी शिफारस करण्यांत आली की, ह्या निर्धीतलें सोने चांदी हिंदुस्थानांत ठेवण्यांत यावें; व जितकें सोनें ह्या निधीमध्ये. आहे त्याचा अर्धा भाग हिंदुस्तानांत असावा. तसेच हा सुवर्णनिधि किती किंमतीचा असावा ह्याबद्दल कोठडीही मर्यादा नसावी व हा निधेि मुख्यत्वें करून सोन्याचे रूपांत असावा व बाकीचा भाग जे रोखे झटकन विकून पैसे वसूल होतील अशा रोख्यांत ठेविला जावा.

 (४४) कमेटांच्या सूचनांवर चर्चा-या सूचनांचा विचार केला असतां आपणांस असे दिसून येईल की, हा जो १ रुपयास २ शिलिंग