पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

७३


सोन्याचा साव्हरिन ह्यांत वर्तमान स्थितीला सोइस्कर असें नवीनच प्रमाण ठर वावें. हे जर करावयाचें नसेल तर दुसरे मार्ग म्हणजे ( १ ) नवोन रुपयांत कमी वजनाची चांदी घालणे किंवा त्याचें वजन कमी करणे; ( २ ) किंवा हल्लींचा रुपया पूर्वीप्रमाणे कायम ठेवून नवीन हलक्या वजनाचीं दोन किंवा तीन रुप- यांची नाणी पाडणें; ( ३ ) किंवा निकलचे रुपये पाडणे; (४) किंवा नोटाबद्दल रुपये देण्याची पद्धत कांही दिवस बंद ठेवणे; हे होत. पण हे सर्व मार्ग कमिटीच्या दृष्टीनें टाकाऊं होते; कारण त्यामुळे लोकांत सरका- राविषयीं फार अविश्वास उत्पन्न झाला असता. आज किती तरी वर्षे रुग्या अस्तित्वांत आहे व त्याचे वजन व किंमत हीं ठरून गेलेली आहेत. ती किंमत व तें वजन बदहणें म्हणजे फार धोक्याचें झालें असतें.

 कमिटीच्या मताने अतिशय सोर्याचा असा हुंडणावळीचा दर म्हटला म्हणजे १ रुपयास २४ पेन्स हा होय व हा दर पौंडाच्या किंमतीच्या नोटांत न दर्शवितां सोन्यांत दर्शविला जावा. कारण त्यावेळी परिस्थिति अशी होती कीं, सोन्याचे नाणे विलायतेंत फारसें प्रचारांत नव्हते, लोकांचे काम सरकारी खजिना.धकारी ह्यांनी काढलेल्या नोटांवरच चालत असे व नोटांबद्दल सोनें मिळण्याची मुष्कील असे; म्हणून ह्या नोटांची किंमत उतरली होती. अतएव कमिटीनें अशी सूचना केली कों, रुपया व पौंडाची नोट ह्याचा संबंध न जोडतां सोनें व रुपया ह्यांचा संबंध जोडावा, म्हणजे १० रुपयांला एक सान्दरिन असा संबंध ह्यापुढे दोघांमध्ये असावा.

 (४३) कमिटीच्या मुख्य सूचना:-:-वरील सूचनेनंतर आणखी कांहीं कमिटीनें सूचना केल्या त्या अशा. सोन्याच्या आयात निर्गतीवर सरकारचा ताबा नसावा व लोकांना ज्या तन्हेची चलन पद्धति हवी तीच सुरू असावी असे जरी सरकारचें धोरण असले पाहिजे तरी होतां होईल तो सोनें सरकारच्या- जवळच खजिन्यांत राहिले पाहिजे. कारण तें परदेशी व्यापारानिमित्त पाठवि- पास उपयोगी पडते. मुंबईला मिंटची शाखा सोन्याचें सान्दरिन व हाफ् साव्हरिन नाणे पाढण्याकरितां उघडली जावी; व ज्या अर्थी इल्लीं चांदीचा दुष्काळ