पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
भारतीय चलनपद्धति.

आवश्यकता कमी करण्याकरितां दोन आणे, चार अणे, आठ आणे, ह्या किंम सांचीं निकलची नाणी पाडण्यांत आली. त्याचप्रमाणे आपल्या जवळचें सोनें वाढविण्याकरितां सरकारने असा ठराव केला कीं, जितके सोनें बाहेरून येईल तितके आपण सांगू त्या दराने विकण्यांत आले पाहिजे. मग बाजारांत त्याचा भाव कांहीही असो. सरतेशेवटी जी गोष्ट आजपर्यंत सरकारने केला नाहीं तो करण्याचा त्याजवर प्रसंग आला. ती गोष्ट म्हणजे मुंबईला लंडनमधील 'रॉयल मिंट ची शाखा उचडणें ही होय.

 (४२) बॅबिंग्टन कमिटीची नेमणूकः - अशी विरुक्षण परि स्थिति प्राप्त झाल्यामुळे स्टेट सेक्रेटरीला बॅबिंग्टन कमिटी नेमणे भाग पडले. ह्या कमिटीपुढें खालील प्रश्न विचाराकरतां मांडण्यांत आले. ( १ ) महा युद्धा- मुळे हिंदुस्थानांतल्या चलनी नाण्याच्या पद्धतीवर, हुंडणावळीवर व चलनी नोटांच्या स्थितीवर झालेल्या परिणामाचा विचार करणे व आजपर्यंत जो अनु- भव मिळाला व पुढे जी चांदीची किंमत वाढेल त्यामुळे प्रचलित पद्धतीत कोणत्या सुधारणा इष्ट आहेत ह्याचा विचार करणे; ( २ ) त्याचप्रमाणें हल्लींच्या पद्धतींत कोणत्या सुधारणा केल्या जाव्यात व व्यापाराच्या गरजा भागविण्याकरितां, सोन्यारुप्यांच्या नाण्यांचे समाधानकारक रीतीनें चलन कायम ठेवण्याकरितां व व 'गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड' स्थिर करण्याकरतां काय करावे ह्याबद्दल सूचना करणे.

 वरील प्रश्नांवरून एक गोष्ट वाचकांस कळून येईल; ती अशी की, कमिटीला हुंडणावळीचा भाव स्थिर कसा | होईल एवढ्याच प्रश्नाचा विचार करावयाचा होता. प्रचचित चलन पद्धति सदोष आहे किंवा निर्दोष आहे व ती जर सदोष असेल तर दुसरी एख दी सुरू करावी किंवा काय वगैरे प्रश्नांबद्दल चर्चा करण्याचे कमिटीस कारण नव्हतें.

 कमिटीच्या दृष्टानें रुपयाच्या किंमतीला स्थिरपणा आणगें ही गोष्ट मह त्वाची होती; म्हणून तिचें असें म्हणणे होते की, जर अगदरच रुपयाच्या किंमतीत असा फरक झाला असेल तर पुन: पूर्वपदावर येण्यापेक्षां रुपया व