पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

७१


अविश्वास उत्पन्न झाला असता; तरीपण ह्याही युक्त्यांचा अवलंब त्यावेळी सरकाराकडून करण्यांत आला होता.

 असो; तर सांगावयाचें तात्पर्य असे की, हिंदुस्तान सरकारच्या रुपयांवर फारच ताण पडला; म्हणून नवीन रुपये पाडणे त्यास फारच जरूर होते व ते रुपये पाडण्यात सरकारास चांदी घेणे भाग होते म्हणून चांदीचा भाव चहूं लागला. हा भाव चढण्याचें दुसरे असे कारण होतें कीं, त्याच वेळी जगामध्ये चांदीची निपज लढाईच्यापूर्वी होणाच्या निपजेहून कमी होऊं लागली. ही स्थिति प्राप्त होतांच लोकही रुपये भयंकर प्रमाणांत लपवून ठेवूं लागले व रुपयाची किंमत इतकी वाढली की, १०० रुपयांच्या नोटीबद्दल जर रोख रुपये एखाद्यास हवे असले तर त्याला ७५ रुपये कांहीं लुच्चे लोक देऊं लागले व अशा रीतीने काहीं काल लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ह्या लोकांनी आपले उखळ पांढरें केले. अशा बिकट परिस्थितीत सरकारने अमेरिकन सरकारकडे चांदीची मागणी केली व त्या सरकारनें परिस्थिति जाणून २० कोटी औंस चांदी पिटमन कायदा पास करून घेऊन हिंदुस्तानांत पाठवून दिली. सरकारने रुपये पाडण्यास सुरुवात केली व डिसेंबर १९१८ च्या सुमारास ८३४ लक्ष रुपये पाडण्यांत आले व अशा तऱ्हेनें रुपयांची हराक मिटविण्यांत आली.

 (४१) हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याकरितां सर- कारचे प्रयत्नः- इतके झाले तरी रुपयांत असलेल्या चांदीची किंमतही सर- काराने ठरविलेल्या रुपयाचे किंमतीहून जास्त होऊं लागली व हुंडणावळीचा भाव १ रुपयास २२ पेन्सपर्यंत येऊन ठेवला व तो त्याच्याही पुढे जाणार अशीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागीं. तेव्हां १ रुपय स १६ पेन्ज जुना दर टिकणे अशक्य झाले. पण सरकारने नुसता हुंडगावळीचा भावव वाढविला नाहीं तर चलनी नाण्याव्यतिरिक्त सेन्याचांदीचा दुसरा उपयोग करणे हा गुन्हा मानला जाईल, त्याचप्रमाणे चांदी किंवा त्या धातू न. के.णी बाहेर पाठविल्यास त्यास शिक्षा केली जाईल वगैरे कायदे पास करून घेतले. तसेंच २३ रुव एक रुपया ह्या किंमतीच्या चलनी नोटा रुपयांचे ऐवजी जारीने सुरू करण्यांत आल्या. चांदीची