पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
भारतीय चलनपद्धति.

कायम ठेवगें कठिण वाटू लागले. हुंडणावळीचा भाव कायम रहाण्याकरितां स्टेट सेक्रेटरी विलायती व्यारापासून सोनें घेऊन ज्या हुंड्या विकत घेतो त्या हुंड्या घेऊन येणाऱ्या व्यापा-यांना हिंदुस्तानसरकारनें रुपये दिले पाहिजेत. आता अशी परिस्थिति उत्पन्न झाली की, हिंदुस्तानचा निर्गत माल खूपच वाढला व आयात माल संपुष्टांत आला; त्यामुळे स्टेट सेक्रेटरीच्या हुंड्यांना खूप मागणी आली. बरें, स्टेट सेक्रेटरीने ही मागणी पुरी करावी तर हिंदुस्तान सरकार जवळ व्यापायांना द्यावयाला रुपये नव्हते. अर्थात हुंडणावळीचा भाव कायम राहणे शक्य नव्हते. त्याच वेळी खेड्यापाड्यांत जे रुपये लोकांत होते ते रुपये लोक सांठवूं लागले व चोहोकडे रुपयांची चणचण भासूं लागडी. आयात माल कमी झाल्यामुळे रुपये व सोन्याची नाणी लोकांत खेळेनाशी झाली म्हणून शेत करी लोक रुपये गडप करून बसले.

 हा प्रसंग असा होता की, त्या वेळी विलायत सरकारने हिंदुस्तान सर- कारकडून बरेच लढाईचें सामान विकत घेतलेले होते. हिंदुस्तानसरकारने अर्थात येथील व्यापाऱ्यांकडून हा माल खरेदी केला च पैसे द्यावयाची ज्या वेळों पाळी आली त्यावेळी विलायत सरकारने हे पैसे स्टेट सेक्रेटरीला देऊन टाकले. येथील सरकारला तर येथील व्यापाग्यांना रोख रुपये देणे भाग होते व त्याप्रमाणें व्यापाऱ्यांांस पैसे मिळालेही. पण मुख्य अडचण अशी होती की, विलायतेमधून हिंदुस्तानांत पैसा सोनें किंवा चांदीच्या रूपानें कसा यावयाचा? ह्या अडचणीमुळे हिंदुस्तानच्या खजिन्यावर फारच ताण पडला. हा ताण किती पडला ह्याची जर कल्पना करावयाची असेल तर आपण त्या वेळचे आकडे पाहिले पाहिजेत. १९१८-१९ साली हिंदुस्तान सरकारला 'होम चार्जेस् ' वगळले तर १४ कोटी पौंडांची उलाढाल करावी लागली व त्या रकमेचा अर्धा भाग केवळ विलायत सरकाराकरतां लढाईनिमित्त खर्च करावा लागला. त्यावेळी हिंदुस्तानांत सोने किंवा चांदी मोठ्या व पुरेशा प्रमाणांत येणें अशक्यच होते. त्याचप्रमाणे हिंदु- स्तानांत चलनी नोटा काढून त्याऐवजी विलायतेंत सोनें वेगळे काढून ठेवणे हें ही अशक्य कोटींतलें झालेले होतें; कारण युद्धकालीं अशा करण्यानें लोकांमध्ये