पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

६९


दिवाळे निघालेले आहे. ही लोकांची कल्पना खोटी ठरविण्याकरितां सरकार नें पोष्ट खातें व खजिन्याचे अधिकारी त्यांना असे हुकूम सोडले कीं, जितके लोक आपल्या ठेवी व चलनी नोटांबद्दल रुपये मागावयास येतील त्यांना रुपये परत करावेत. ह्या हुकुमामुळे लोकांचा विश्वास सरकारावर ताबडतोब बसून पुनः लोक आपल्या ठेवी पोष्टांत आणून ठेऊं लागले.

 चेबरलेन कमिशनची अशी सूचना होती की, सरकारनें लागेल तेवढे सोनें बाहेर काढून आणीबाणीच्या वेळी व्यापाऱ्यांची गरज भागवावी; त्या सूचनेप्रमाणे सरकारनें सोनें खजिन्यांतून बाहेर काढून हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याचा निश्चय केला व कित्येक आठवडेपर्यंत प्रत्येक आठवड्यास १० लाख पौंड किमतीच्या उलट हुंडया स्टेट सेक्रेटरीवर विकण्यास सुरुवात केली. हे व इतर उपाय योजून सरकारने हुंडणावळीचा भाव कायम ठेवला. त्या वेळी स्टेट सेक्रेटरीजवळ भरपूर सोनें होतें. खजिन्यांतील शिल्लक व विलायत व हिंदुस्थान येथे सुवर्णनिधि मिळून दोन कोटी ३५ लाख पौंड किंमतीचे होतें. चलनी नोटांकरतां राखून ठेवलेल्या ठेवीतून '४० लाख पौंडांचे सोने काढून तें सुवर्णनिधीत ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेमुळे सरकारला रुपयाची किंमत कायम ठेवतां आली व नोटांबद्दल रुपये लोकांस देतां आले.

 पण ही स्थिति अशीच कायम रहाणे कठिण होतें. लढाई यशस्वी व्हावी म्हणून हिंदुस्ताननें तिला लागणारें सामान व धान्य वगैरे जिन्नस बाहेर पाठविले व जर्मनीनें पाणबुड्याची मोहीम जोरांत सुरू केल्यामुळे व प्रत्येक राष्ट्र लढाईत गुंतल्यामुळे हिंदुस्तानांत बाहेरून माल थोडा येऊं लागला. ह्या सर्वोवर कळस म्हणजे सोने व चांदी त्यांच्या हालचालीमध्ये भयंकर फरक पडत जाणे हैं होय. प्रत्येक राष्ट्रला लढाईचे सामान विकत घेण्याकरिता सोन्याची फारच जरुरी भासूं लागली व जे ते राष्ट्र सोनें सांठवूं लागले व आपली नित्यांतली गरज चांदीवर भागवूं लागले. त्यामुळे हिंदुस्तानांत नेहमी येणारा सोन्याचा प्रवाह आटून चांदीची किंमतही वाढू लागली. अशा परिस्थितीत हिंदुस्तानांत सोन्याचांदीचा दुष्काळ पडून सरकारला रुपयाचें व सोन्याचें पूर्वीचे प्रमाण