पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
भारतीय चलनपद्धति.

तांना विलायतेंत जी हिंदुस्थान सरकारची शिल्लक पाठविण्यांत येते तिचा हिंदुस्थानांतच उपयोग करण्याची हिंदुस्थान सरकारनें खटपट करावी; पण जर स्टेट सेक्रेटरीला कर्ज काढण्याचा प्रसंग येत असेल तर अशा प्रसंगी ही शिल्लक येथे न ठेवतां विलायतेंतच पाठविलेली बरी. ह्या सूचनांशिवाय इतर किरकोळ सूचना कमिशननें केल्या. उदाहरणार्थ, एकादी मध्यवर्ती पेढी हिंदुस्थानांत असावी अशी एक सूचना करण्यांत आली होती.

भाग ६ वा.
युद्धकालीन परिस्थिति.


 (४०) युद्धामुळें रुपयांची भासणारी चणचण व चांदीच्या दरामध्यें विलक्षण वाढ:-चेंबरलेन कमिशनचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून सगळ्याच जगांत मोठी घडामोड झाली व ह्या घडामोडींचे कारण म्हणजे जगड्- व्याळ युद्ध हे होय. हे युद्ध सुरू झाल्यामुळे हिंदुस्थान सरकारनें चैवरलेन कमि शनच्या कांही सूचना स्वीकारून बाकीच्या सूचनांची अम्मलबजावणी करण्याचे लांबणीवर टाकलें. युद्धाचा पहिला परिणाम असा झाला कीं, लोक सोनें गुप्त रीतीनें सांठवूं लागले. म्हणून सरकारास खाजगी कामाकरितां लोकांस सोनें देण्याची चाल बंद करावी लागली. लोक भराभर पोष्टांच्या बँकांत जाऊन आपल्या रकमा परत मागूं लागले व चलनी नोटांबद्दल रुपये मागूं लागले; ह्या गोष्टी घडण्याचें कारण म्हणजे लोकांना असे वाटले कीं, सरकारचें ह्या युद्धामुळे


  • हल्ली १९२१ जानेवारीपासून अशी बँक स्थापन झालेली आहे.