पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०७ पासून १९१३ सालापर्यंतची परिस्थिति.

६७


खात्यांत * काढून ठेवले पाहिजे. अशीच पद्धत हिंदुस्थानांत आहे, ती जरा ढिली करून म्हणजे युरोपखंडांत इतर राष्ट्रांत असलेल्या पद्धतीत्रमाणें जितक्या किंमतीच्या नोटा प्रचलित असतील त्या किंमतीपैकी ठराविक रक्कम बाजूला काढून जास्त नोटा प्रचारांत आगाध्या ५०० रुपयांच्या किंमतीच्या नोटा लोकप्रिय करण्यांत याव्या व नोटांबद्दल रुपये ताबडतोब पटवून देण्याची व्यवस्था व्हावी. ज्या नोटा प्रचलित करण्यांत येत असतांना त्या किंमतीचे सोनें किंवा चांदी बाजूला काढून ठेवावी लागत नाही अशा रकमेवर ती रक्कम सरकारी रोख्यांत न गुंतवितां, तात्पुरतें कर्ज द्यावे किंवा इतर केणत्याही तन्हेने ती रक्कम गुंतवावी; पण ही रक्कम हिंदुस्थान किंवा इंग्लंड ह्या देशांत गुंतवितांना किंवा कर्जाऊ देतांना कांही ठराविक इयत्ता ठरवून घ्यावी. आणखी एक महत्त्वाची सूचना कमिशननें केली. ती अशी की, सरकारनें नेहमी जादा शिलकेंतून प्रेसिडेन्सी बँकांना कर्ज देन जावें; कारण ज्या वेळीं व्यापायांना रकमेची फार जरूर असते अशा वेळीं ही फाजील शिल्लक उगीच अडकावून ठेवणे फयदेशीर नाहीं. तसेंच कधीकधीं स्टेट सेक्रेटरीजवळ सोनें भरपूर असतांना स्वस्त दरानें तो हुंडया विकावयास काढीत असतो. हैं करणें बरोबर नाही. तसेच हिंदुस्थान सरकारनें अपढ़ें वर्ष एप्रिल पहिलीपासून सुरू न करतां नोव्हेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून सुरू करावें, म्हणजे आप अंदाजपतक त्यास अधिक बिनचूक करता येईल व त्यामुळे स्टेट सेक्रेटरीला आपल्या निकडीच्या गरजा भागवून लंडनमध्ये किती रक्कम आपणास कजाँऊ काढावी लागेल हे नक्की ठरवितां येईल. त्याचप्रमाणे स्टेट सेक्रेटरीला गरज नस-


 *पार्लमेंटने बँक आफू इंग्लंडकरितां पास केलेल्या कायद्यान्वयें ह्या पेढीला दर आठवडयाला एक ताळेबंद छापावा लागतो व त्यामध्ये दोन भाग असतात. एका भागाला Issue Department असें नांव असून त्यामध्ये त्या पेढीनें काढिलेल्या नोटांचा हिशोब दिलेला असतो व दुसऱ्या भागाला Banking Department अर्से नांव असून त्यामध्ये पेढीच्या देण्या- घेण्याचा व मालमत्तेचा हिशोब दिलेला असतो.