पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
भारतीय चलनपद्धति.

इच्छा असेल तर हीं दोन्हीं सुरू करावींत. पण ती सुरू होईपर्यंत हल्लीचीच पद्धत कायम ठेवावी व होतां होईल तो नोटांचा प्रसार जास्त प्रमाणांत चालू करवा.

 (२) गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशां- तल्या प्रचलित चलनी नाण्याचें जरूर तेवढेच परराष्ट्रीय चलनी नाण्यांत परि- वर्तन होण्याकरितां सोनें व सरकारी रोखे (स्टलिंग सिक्युरिटीज) त्यांचा पुरेस। संग्रह असणे ही होय. ह्या बाबतीत कमिशनने हिंदुस्थान सरकारच्या सूचनांस पाठिंबा दिला व असे ठरविलें की, गंगाजळी ठेवीमध्ये किती रक्कम असावी मर्यादित करूं नये. पण सध्यां आहे त्यापेक्षां तो वाढवला पाहिजे व सर्व गंगाजळी ठेवीचा निम्मा भग सोन्याच्या रूपानें ठेवश पाहिजे; कारण ह्या गंगाजळी ठेवीचा हेतु ज्या वेळी हुंडणावळीच्या भावांत गडबड होऊन हुंडया विकर्णे अशक्य होऊन बसतें त्यावेळी स्टेट सेक्रेटरीने आपला कौन्सिलचा खर्च ह्या ठेवींतून भागवून घेगें एवढाच कांहीं ह्या ठेवीचा उपयोग नाहीं तर ज्या वेळी हिंदुस्थानचा निर्गत माल आयात मालापेक्षा कमी होऊन हिंदुस्थानला बाहेर पैसे पाठवावे लागतात त्यावेळोदी ह्या ठेवीचा उपयोग करावयाचा असतो. अशा कारणामुळे ह्या ठेवीतले सोनें सरकारी रोखे विकत घेऊन गुंतविण्यांत येऊं नये. तसेव १९०७-८ साली जी परिस्थिति उत्पन्न झाली तशी परिस्थिति उत्पन्न झाली असतांना हिंदुस्थान सरकारने स्टेट सेक्रेटरीवर उलट हुंडया हव्या तेवढ्या काढून व्यापायांस सोनें पुरविले पाहिजे. शिवाय हे सोनें विला- यतेंत रहिले पाहिजे व हिंदुस्थानांत ह्याच ठेवीचा भाग जो चांदीच्या रूपांत ठेवलेला आहे तो काढून टाकला पाहिजे.

 (३) चलनी नोटांच्या पद्धतीला जास्त लवचिकपणा आला पाहिजे. इल्लींची पद्धति बँक अफ् इंग्लंडच्या पद्धतीवर बसवलेली आहे. ह्या बँकेला १८४४ च्या बँक अॅक्ट न्वयें १ कोटी ४० लाख पौंडांपर्यंत सरकारी व इतर रोख्यांच्या आधारावर नोटा काढण्याचा अधिकार आहे. पण पुढे जर जास्त नोटा प्रचलित करावयाच्या असतील तर तेवढ्या किंमतीचें सोने बँकिंग