पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०७ पासून १९१३ सालापर्यंतची परिस्थिति.

६५


 (१) हिंदुस्थानसरकारची असलेला सामान्य शिल्लक कोठें ठेवावयाची व तिची कशी व्यवस्था करावयाची ह्याबद्दल चवकशी करणे; (२) स्टेट सेक्रेटरीने काढलेल्या हुंडया किंवा तारेच्या हुंडया ह्यांची विक्री; ( ३ ) १८९८ सालीं फौलर कमिटीनें केलेल्या सूचनांप्रमाणे किंवा त्या सूचनांना पोषक असा हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याकरितां व विशेषतः सुवर्णनिधि म्हणजे गंगाजळी व चलनी नोटांप्री यर्थ राखून ठेवलेला निधि ह्यांचा उपयोग करणे - विनियोग करणे व ते ठेवण्याची जागा ह्यासंबंधानें ज्या सूचना कमिटीनें केलेल्या आहेत त्यांसंबंधाने हिंदुस्थानसरकार व स्टेट सेक्रेटरी ह्यांनी अमलांत आणलेले उपाय. दल्लीं ह्या वर सांगितलेल्या बाबींसंबंधाने जी व्यवस्था आहे ती हिंदुस्थानाला कितपत फायदेशीर आहे ह्यासंबंधानें सूचना करणे वगैरे.

 (३९) कमिशननें केलेल्या सूचना:- ( १ ) फौलर कमिटीने केलेल्या सूचना फार योग्य आहेत असे आजपर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. चांदीच्याऐवजी सोनें हेच वस्तूंची किंमत ठरविण्यांत प्राण मानण्यांत आले आहे, त्यामुळे हिंदुस्थान वें कोटकल्याण झाले आहे. हुंडणा- वळीचा भाव स्थिर असणे ही गोष्ट हिंदुस्थानास फार महत्त्वाची आहे; तरी- पण ही गोष्ट फौलर कमेटीच्या मतानें दुय्यम होती. कारण त्या कमिटीच्या मतानें मुख्य गोष्ट म्हणजे सोन्याचें चलनी नाणे सुरू करणे ही होय. हिंदु- स्थान सरकारनें ही सूचना अमलांत आणण्याची खूप खटपट केली; पण परिस्थितीपुढे त्या सरकारला हात टेकावे लागले. हल्ली हिंदुस्थानांत सुवर्ण- विनिमयपरिमाणपद्धति प्रचलित आहे. ह्याच पद्धतीला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे नांव आहे. ही पद्धति आर्ता भरभक्कम पायावर स्थापन झालेली आहे व १९०७-८ साल वगळलें तर ही पद्धति सर्व गोष्टींचा विचार करतां हिंदु- स्थानला फार फायद्याची आहे. कारण ती स्वस्त आहे व दुसरी सुवर्णचलन- पद्धति सुरू करावी तर हिंदुस्थानांत पेढ्यांची वाढ फारशी झालेली नाहीं. हिंदु- स्थानला वास्तविक पाहता सोन्याच्या चलनी नाण्याची व ती नाणी पाडण्या- करितां एखाद्या टांकसाळीची फारशी जरूरी नाहीं. तरीपण लोकांची उत्कट