पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०७ पासून १९१३ सालापर्तची परिस्थिती.

६३


 (३७) १९०८ सालचा सरकारचा अनुभवः - ( १ ) आहे त्यापेक्षा जास्त गंगाजळीची आवश्यकता; ( २ ) लंडनमध्ये सोने किंवा सोन्याचे नाणें अधिक प्रमाणांत ठेवण्यापासून फायदे; सरकारी रोखे ( सिक्युरिटीज् ) ठेवण्यापेक्षां सोनें ठेवणे अधिक श्रेयस्कर आहे; (३) आणीबाणीच्या वेळीं अगोदरच एक धोरण आखून ते लोकांत जाहीर केल्याने फार फायदा होतो. कारण पेढीवाले व बाहेर माल पाठविणारे व्यापारी ह्या दोघांना, ज्या- प्रमाणे सरकारला आणीबाणीच्या वेळी सर्व साधनें अनुकूल असणे इष्ट असतें, त्याप्रमाण हुंडणावळीचा भाव स्थिर करण्याचे बाबतीत सरकारावर विश्वास ठेवणें इष्ट असतें; ( ४ ) एकाच दिवशी एकाच व्यापायाला हिंदुस्थानाबाहेर पाठविण्याकरितां १०.००० पौंडांपेक्षा जास्त रकम न देणे व देशांतल्या देशांत सोनें खजिन्यांतून बाहेर जाऊं देणे ह्य.पासून फारसा फायदा होत नाहीं; ( ५ ) हिंदुस्थानांत जे सोनें प्रचलित आहे त्याचा उपयोग हुंडणावळीचा भाव स्थिर किंवा कायम ठेवण्याचे काम फारसा होत नाहीं. ह्या सर्व सूचनांपैकी पहिली सूचना महत्वाची आहे. सुवर्णनिधि, जो मुद्दाम राखून ठेवण्यांत आलेला आहे, त्याला, स्टेट सेक्रेटरीनें रेल्वे कंपन्या वगैरेंना भांडवल पुरवून, धक्का लावत कामा नये व निधि सिक्युरिटीजमध्ये न ठेवतां सोन्यांतच ठेविला पाहिजे. कारण हा निधेि म्हणजे सरकार, व्यापारी वगैरे भांडवलवाले त्यांना आधार- स्तंभच आहे; म्हणून हिंदुस्थान सरकारने अशी सूचना केली की, खजिन्यांत "चलनी नोटांच्याकरितां राखून ठेवलेल्या ठगविक किंमतीच्या सोन्याशिवाय अडीच कोटी पौंड किंमतीचें सोनें किमानपक्ष बाजूला काढून ठेवले पाहिजे व तितकें सोनें साचेपर्यंत सरकारनें स्टेट सेक्रेटरीस असे कळविले कीं, त्यानें रेल्वे वगैरेसारख्या संस्थांना कर्जाने पैसे देऊं नये. स्टेट सेक्रेटरीनें २,५०,००,००० सान्दरिन ही रकम राखून ठेवण्यास संमति दिली; पण त्याचे म्हणणे असे होतें कीं, चलनी नोटांप्रीत्यर्थ राखून ठेवलेली शिल्लक व सुवर्णनिधींतील शिल्लक मिळून ही रक्कम असावी, व एवढी रकम जमेपर्यंत रुपयांवरील नफ्याचे सोने खरेदी करीत ज वें. तर्हेच व्याजीं रकम न लावितां ती तशीच विनाकारण अडकावून ठेवणे हे त्यास संमत नव्हते. कारण त्यामुळे व्याजाचे नुकसान होते. शिवाय सिक्युरिटी