पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
भारतीय चलनपद्धति.

अमेरिकेत पैशाची टंचाई पडून युरोपखंडांतही सोन्याची चणचण भासूं लागली. त्याच वेळेला बँक आफ् इंग्लंडने आपला दर ७ टकेपर्यंत चढविला. अशा तऱ्हेनें लंडन शहरांत पैशाची हकाटी सुरू झाली; हिंदुस्तानचा निर्गत मालही कमी झाल्या कारणानें स्टेट सेक्रेटरीच्या हुंड्यांस मागणी येईनाशी झाली; हुंडणा• चळीचा भाव उतरत चालला व स्टेट सेक्रेटरीने हुंड्या विकावयाचें बंद केल्यावर हा भाव १५१३ वर येऊन ठेपला. अशा वेळी हिंदुस्तान सरकार स्टेट सेक्रेटरी - वर उलट हुंड्या विकूं लागले; पण प्रथम सरकारचें धोरण निश्चित होईना. कांहीं तज्ज्ञांचे मत पडलें कीं, जे कांहीं सोनें खजिन्यांत असेल तें व्यापा किंवा हुंड्या विकत घेणारांस देऊन टाकावे. उलट दुसऱ्या लोकांचे असें मत पडले की, सध्यां अमेरिकेत सट्टेबाजी जोराने चालत असल्यामुळे हिंदुस्तानांतलें सोनें होतां होईल तो बाहेर जाऊं देऊं नये. स्टेट सेक्रेटरीच मतही निश्चित होईना. तो एक वेळ म्हणे कीं, बँकाना सोनें देऊं नका; पुनः दुसरी तार अशी करी कीं, जरी त्या बँका जबर नफा मिळवीत असल्या तरी त्यांना सोने जास्त प्रमाणांत देण्यास कांहीं हरकत नाही. अशा अनिश्चित स्थितीतच सरकारने १५३२ भावानें उलट हुंड्या विकावयास काढल्या व स्टेट सेक्रेटरीनें सोनें विलायतेंत देण्यास सुरुवात केली. पुन: हुंडणावळीच्या भावांत चढउतार होऊन अखेरीस मार्च महिन्यांत असे ठरले कों, हिंदुस्तानांत आठवड्यांतून एकदां १५३३ पेन्स ह्या दरानें हुंडया विकावयास काढाव्यात, पण पूर्वी सुच- विल्याप्रमाणें १४३३ पेक्षां कमी नसलेल्या दरानें तारेच्या हुंडचा विकावयास काढू नयेत. इकडे स्टेट सेक्रेटरीनें गंगाजळीतले रोखे विकावयास कढून रोख सोनें तयार करून ठेवलें. त्याच सुमारास मुंबईमध्ये चांदीच्या लगडया सट्टेबाजी करता म्हणा किंवा खरोखर व्यापाराकरितां रहगा येऊं लागल्या व हुंडणावळीचा भाव १५३ वर आला. पुन ह्या भावांत चढउतार होऊन जुलै महिन्यांत पावसाळा सुरू होऊन चणचणीची वेळ निघून गेली. सप्तेवरमध्ये पुनः भाव चढून गेल्या- वर सरकारनें हुंडया विकण्याचें बंद झाले. त्या वर्षात सरकारला जे अनुभव आले ते असेः-