पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०७ पासून १९१३ सालापर्यंतची परिस्थिती.

६१


आहे की, ज्या वेळी स्टेट सेक्रेटरीला आपल्या हुंब्या कायदेशीर रीतीनें विकणे अशक्य होईल किंवा हिंदुस्तानचा आयात माल निर्गत मालापेक्षा जास्त होऊन ह्या देशाला परदेशच्या व्यापाऱ्यांस सोनें पाठवावें लागेल अशा वेळी त्या गंगाजळी ठेवीचा उपयोग करण्यांत यावा. ज्या ज्या वेळी हिंदुस्तानांतल्या लोकांना प्रचलित असलेल्या रुपयांबदली साव्हरिन हवे असतील त्या त्या वेळीं त्यांना ते साहरिन पुरवणे किंवा ते जर साव्हरिन अपुरे असतील तर ह्या ठेवींतल्या सोन्याचे साव्हरिन पाडून देणें ह्याकरतां कांहीं ही ठेव निर्माण कर व्यांत आलेली नाहीं. तेव्हां किती सोनें ठेवांत ठेवावयाचें है हिंदुस्तानच्या व्यापाराच्या वाढीवर व दुष्काळ वगैरे कारणांनी प्रतिकूल परिस्थिति उत्पन्न झाली असतांनां परदेशच्या व्यापाऱ्यांना देण्याकरतां किती तूट पडेल ह्यावर अवलंबून राहील.

भाग पांचवा.

-:-X•X-:-

१९०७ पासून १९९३ सालपर्यंतची परिस्थिति.


 (३६) १९०७-८ सालची हुंड्यांची विक्रीः- १९०७-८ साल हुंडणावळीच्या भावांत मोठी क्रांति झाली. त्या साली मोठा दुष्काळ पडला त्यामुळे गहुं, ताग वगैरे माल बाहेर पाठविण्यांत आला नाही. स्टेट सेक्रेटरीने आपल्या हुंच्या १३१ लाखपर्यंतच विकल्या. १९०६ साली त्याच स्टेट सेक्रेटरीनें त्या ३४० लाखपर्यंत विकल्या होत्या. 'गंडस्योपरि पीटिका संवृत्ता' ह्या म्हणीप्रमाणे