पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
भारतीय चलनपद्धति.

चळीचा भाव स्थिर रहावा म्हणून ही ठेव निर्माण करण्यांत आलेली आहे व ज्या लोकांत सरकारच्या कृत्रिम किंमतीच्या नाण्याबद्दल विश्वास उत्पन्न करावयाचा ते लोक जर हिंदुस्तानांत आहेत तर ही गंगाजळी ठेव येथेच ठेव- ण्यांत आली पाहिजे. त्याचप्रमाणे आणीबाणीच्यावेळी जर सरकाराला जरूर लागली तर त्यावेळी ह्या ठेवीची मदत होऊं शकत नाही. कारण ह्या ठेवीचा निम्याहून अधिक भाग सरकारी रोख्यांत अडकून ठेवलेला असतो व ते रोखे जर एकदम विक वयाला काढले तर कमी किंमतीला विकावे लागून त्यापासून लाखों रुपयांचे नुकसान होतें. त्याचप्रमाणे ह्या सुवर्णनिधीला तुम्ही जर गंगाजळी ठेव हे नांव देणार तर हुंडणावळीचा भाव स्थिर करण्याव्यतिरिक्त इतर कोणच्याही कामाकडे ह्या ठेवीचा उपयोग करता कामा नये; परंतु वस्तु- स्थिती पहावी तो स्टेट सेक्रेटरीला रेल्वेसारख्या संस्थांत सामान खरेदी करण्यां- करितां ह्या ठेवीचा विनियोग करण्याचा मोह आवरत नाहीं. ही ठेव वास्तविक हिंदुस्तानच्या लोकांच्या निढळाच्या घामापासून उत्पन्न झाली आहे व त्या ठेवीचा उपयोग हिंदुस्तानच्या व्यापाऱ्यांसच झाला पाहिजे; पण मौज अशी कीं, हे व्यापारी चांगले व्याज देत असतांना त्यांना ठेवींतून पैसे मिळत नाहीत. पण विलायतच्या व्यापायांना थोड्या व्याजाने हिंदुस्तानची रकम वापरावयास मिळत आहे. 'चाकरास मलीदा व धन्याला धत्तुरा "ह्या म्हणीचे हें उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेंच ह्या ठेवीला जर सुवर्णगंगाजळी ठेव असे नांव द्यावयाचें तर त्या ठेवीत चांदी किंवा कागदी रोखे कां असावेत हें समजणें जरा कठिणच आहे. आतां एका मुद्याचा विचार करून हा ठेवीचा विषय संपवूं तो मुद्दा हा की, त्या ठेवींत किती किंमतीचें सोनें ठेवावें? १९१३ साली चेंबरलेन कमिशन नेम- ण्यांत आले. त्या कमिशनसमोर ह्या ठेवीबद्दल बरेच प्रश्न विचारार्थ ठेवले गेले होते. त्या प्रश्नःपैकी हा एक प्रश्न होता. कमिशननें आपले मत असे दिलें कीं, या ठेवीत किती सोने ठेवावें हें ठरावणें कठिण आहे. ह्या ठेवीचा उद्देश असा


महायुद्ध सुरू झाल्यावर ही चांदी काढून त्याबदली सोने ठेवण्यांत आलेले आहे.