पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२० व्याशतकांच्या प्रारंभींची चलनपद्धति.

५९


विकत घेऊन देऊं लागले. १९०४ सालापासून १९१७ सालापर्यंत स्टेट सेक्रेटरी आपली बिलें किंवा हुंडया १ रुपयास १६८ पेन्स ह्या भावानें विकत आलेला आहे. ज्या वेळीं हिंदुस्थानांत चांदीची जरूर असेल त्यावेळी स्टेट सेक्रेटरी विलायतेंत चांदी खरेदी करून ती इकडे पाठवून देत असतो. एखादे वेळीं हिंदुस्थानांत साव्हरीन वाजवीहून जास्त प्रमाणांत जमूं लागले म्हणजे महायुद्ध - चेपूर्वी अशी चाल होती कीं, आस्ट्रेलिया किंवा इजिप्त ह्या देशांतून हिंदुस्थ नांत जे साठहरिन पाठावलेले असतात त्यावरच १ रुपयास १६ पेन्स किंवा फार तर १६३३ पेन्स ह्या दराने टेलिपॅफिक ट्रॅन्स्फर (तारेच्या हुंड्या) विकावयास काढल्या जात; व हा दर असा असे की, त्य मुळे हिंदुस्तानांत साव्हरिन पाठ- विण्यापेक्षां ते विलायतेंत पाठविणेच जास्त फायदेशीर होई. असो. १९०५ सालापासून हिंदुस्तान सरकारला विलायतेंत सोनें पाठविण्याचा प्रसंग फारसा आलेला नाही. जेव्हां स्टेट सेक्रेटरीला सोन्याची जरूरी भासते तेव्हां तो आपल्या हुंड्या विकावयास काढून आपली सोन्याची भरती करून घेत असतो.

 (३५) ह्या ठेवीसंबंधानें सामान्य चर्चा:- अशा स्वरूपाची ही गंगाजळी ठेव आहे. गंगाजळी ठेवीचा कांहीं भाग चलनी नोटांच्याप्रीत्यर्थं राखून ठेवलेल्या निधीमध्ये ठेवलेला असतो व मुख्य भागाला गोल्ड स्टैंडर्ड रिझर्व्ह असें नांव देण्यांत आलेले आहे. त्या ठेवीचा काही भाग सरकारी रोख्यांच्या रुपानें असतां कांही भाग विलायतेत थोड्या मुदतीने कर्ज ह्मणून खर्च केलेला असतो; कांहीं भाग सोन्याच्या रूपाने बँक आफ् इंग्लंडमध्ये ठेवलेला असतो व कांहीं भाग हिंदुस्तानांत चांदीचे रुपानें ठेवलेला असतो.

 ह्या गंगाजळी ठेवीसंबंधानें विचार करीत असतांना खालील प्रश्न आपल्या. समोर प्रामुख्याने येतात:- (१) ह्या ठेवीचा उद्देश काय ? म्हणजे ही कशाकरितां निर्माण करण्यांत आली? ( २ ) कोणत्या रूपांत ही ठेवण्यांत यावी? (३ ) ती कोठें ठेवण्यात यावी? ( ४ ) तिची वाढ कोठपर्यंत होऊं द्यावी ? या प्रश्नांपैकी कांही प्रश्नांचे उत्तर वर आलेलेच आहे. मुख्यतः दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नांवरच लोकमत सरकारविरुद्ध आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्याअर्थी हुंडणा-