पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
भारतीय चलनपद्धति.

जेव्हां सांचेल तेव्हां त्या जादा रकमेचा चांदी विकत घेण्याकडे विनियोग करावा व तिसरी सूचना अशी की, रुपयांची नाणी पाडतांना सरकारास जो नफा होतो त्या नफ्याचा विनियोग ह्या चलनी नोटाप्रीत्यर्थ लागणाऱ्या निधी- व्यतिरिक्त एक गंग जळी ठेव निर्माण करण्यांत या. ह्या तिन्ही सूचनांचा सेक्रेटरी आफ् (स्टेटनें स्त्रीकर केला व अशा रीतीनें सुवर्णविनिमयपरिमाण- पद्धति व सुवर्णगंगाजळी ठेव (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड व गोल्ड स्टँडर्ड रिझव्र्व्हे) ह्यांचा पाया ह्या खलित्यामुळे घातला गेला. हिंदुस्थान सरकारची अशी इच्छा होती कीं, ही गंगाजळी ठेव हिंदुस्थानांतच आपल्या ताव्यांत असावी; पण स्टेट सेक्रेटरीच्या आग्रहावरून ती विलायतेतच ठेवण्यांत आली. अशा रीतीनें फौलर कमिटीच्या सूचनेविरुद्ध ह्या गंगाजळीची प्राणप्रतिष्ठा विलायतेंत झाल्यामुळे हिंदुस्थानच्या व्यापयांचा तोटा होत आहे.

 प्रथम प्रथम सरकारास रुपयांवर जो नफा होत असे त्याचे सोने घेऊन तें विलायतेत पाठविले जाई व हें सोनें चलनी नोटांच्या निर्धीतून काढले जाई. पण पुढे पुढे १९०५ पासून हिंदुस्थानव्या निर्गत व्यापाराला आर्थिक मदत करण्याकरितां म्हणजे हिंदुस्थानांत पैसे पाठवू इच्छिणाऱ्या विला- यतेच्या व्यापा-यांची सोय करण्याकरितां स्टेट सेक्रेटरीकडून हुंड्या विकण्याची पद्धत सुरू झाली. ह्या पद्धतीपासून असा फायदा होऊ लागला की, हिंदुस्थान- सरकारला विलायतेंत सोने बिनखर्चाने पाठवितां येऊं लागले. ज्या विलाय- तच्या व्यापाऱ्यांना हिंदुस्थानांत पैसे पाठवावयाचे असतील त्यांनी स्टेट सेक्रे- टरीनें विकण्यास काढलेल्या हुंड्या (कौन्सिल बिल) विकत घेऊन तेथें सोन्याच्या रूपानें पैसे भरावे व त्या विकत घेतलेल्या हुंडया ज्या व्यापाऱ्यांस हिंदुस्थानांत पैसे घ्यावयचे असतील त्या व्यापायांकडे पाठवून द्याव्या व त्या व्यापान्यांन खजिन्यांत त्या हुंडया पटवून रुपये घेऊन जावे. ह्या हुंडया विकावयाला काढ- त्यानें स्टेट सेक्रेटरीला एक नवीन उत्पन्नाची बाब मिळाली. कारण पूर्वी विलायतचे व्यापारी इकडे सोनें पाठवीत असतांना त्यांना विमा उतरण्याचा वगैरे जो खर्च येई तो थोडा कमी का होईना पण आतां ते स्टेट सेक्रेटरीला त्याने काढलेल्या हंड्या