पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२० व्या शतकांच्या प्रारंभींची चलनपद्धति.

५७


जो निधि राखून ठेवण्यांत आला त्यांत १० कोटींचे सरकारी रोखे वगैरे होते व १७ कोटींची नाणीं व सोनें होतें. सरकारला असे वाटले कीं, ९॥ कोटींचे रुपये राखून ठेवले असतां काम भागेल व ७॥ कोटींचें सोनें ठेवलें असतांना जो कोणी नोटा घेऊन येईल त्याला सोन्याचे साव्हरीन देण्यांत येतील. पण सरकारला लवकरच असा अनुभव आला कीं, जितके साहरिन लोकांमध्ये प्रचलित कर ण्याचा प्रयत्न करावा तितके सान्दरिन पुनः खजिन्यांत परत येऊं लागतात व प्रत्येक वेळी लोक नोटा घेऊन खजिन्यांत आले असतां रुपयेच मागतात. तेव्हां सरकारनें असें ठरविलें कीं, सान्दरिन फारसे प्रचारांत न आणतां खजिन्यांत रुपयांचाच भरणा जास्त करावयाचा. कारण सोन्याच्या नाण्यांत रुपयाला हांकून देण्याची धमक नाही व लोकांचें रुपयांवर फारच प्रेम आहे; कारण तो जवळ जवळ ४०० वर्षे प्रचारात आहे. तेव्हां परिस्थिति अशी प्राप्त झाली की, सरकारला लिंडसेसाहेबानें केलेल्या योजनेचा न कळत पुरस्कार करावा लागला. फरक एवढाच की, लिंडसेचें म्हणणे आणीबाणीच्या वेळी कर्ज क.दून गंगाजळी निर्माण करावी तर सरकारने अशा कर्जावर भिस्त न ठेवतां एक रुपयामागें ५ आणे नफा मिळवून जो कांहीं संचय केलेला होता त्यापासूनच ती ठेव निर्माण करण्याचे ठरविले.

 वर सांगितल्याप्रमाणे सरकारला अनुभव आलाच होता कीं, हिंदुस्थानांत खजिन्यामध्ये विवक्षित किंमतीच्या सोन्यानंतर शिलकींत रुपयेच जास्त राखून ठेवले पाहिजेत व सोनें सांठवून ठेवण्यापेक्षां चांदीच पुरेशी राखून ठेवली पाहिजे व आपल्याला जर हुंडणावळीचा भाव स्थिर ठेवाव- याचा असेल तर एक निराळाच निधि निर्माण केला पाहिजे. सर एडवर्डलॉ ह्यानें एक खलिता सेक्रेटरी ऑफू स्टेटकडे पाटवून दिला; त्यांत त्यानें तीन मुख्य सूचना केल्या; पहिली सूचना अशी की, हिंदुस्थानांत चलनी नोटा खाज- न्यांत जेव्हां आणल्या जातात तेव्हां लोकांना रुपयांचीच अपेक्षा असते, तेव्हां हिंदुस्थानच्या खजिन्यांत चलनी नोटांकरितां राखून ठेवलेल्या नित्रीमध्ये ७० लाख साव्हरिन ठेवले असतां काम भागणार आहे म्हणून ह्या रकमेहून जास्त रक्कम ठेवण्याचे कारण नाही. दुसरी सूचना अशी की, ह्या रकमेहून जास्त रकम

बालन पोतदार