पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
भारतीय चलनपद्धति.

जबाबदारी असते कीं, सोन्याबद्दल ठराविक दरानें कृत्रिम किमतीचे रुपये लोकांना द्यावयाचे व ज्यावेळी रुपयाचा हुंडणावळीचा भाव उतरेल त्यावेळी विलायतेच्या व्यापायांना सोनें पुरवावयाचे. रुपयाची कृत्रिम किंमत चांदीच्या मूळ किंमतीपेक्षां (Intrinsic value ) जास्त ठरविली असल्या कारणानें जो नफा सरकारास होतो त्या नफ्याचीच विलायतेंत सोन्याची गंगाजळी ठेवण्यांत येते.

 अशा प्रकारचें हें गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड 'न हिंदु न यवनः' अशा पद्धतीचे आहे. पण ह्या घेडगुजरी चलनी पद्धतीची केनीस व स्पॅल्डिंगसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी व इतर इंग्रजी मुत्सद्यांनीं मनमुराद स्तुति केलेली आहे. त्यांचे असे म्हणगें आहे की, जेव्हां एखादी वस्तू चांगली असते तेव्हांच त्या वस्तूची नक्कल इतरत्र होत असते. ज्या अर्थी हिंदुस्थानांत प्रचलित असलेली चलन- पद्धीत फिल्पिाइन बेटें, मेक्सिको व जपानसारख्या देशांत सुरू करण्यांत येते त्याअर्थी ही पद्धति चांगली आहे ह्याबद्दल निराळा पुरावा नको. ह्या लोकांचे मताने ह्या पद्धतीचा विशेष असा आहे कीं, तिजमुळे देशांतल्यादेशांत लोकांचा व्यवहार चांदीची नाणी व चलनी नोटा यांवर भागून सोन्याची काटकसर करतां येते; व ज्यावेळी परदेशांत सोनें पाठवावयाचें असतें त्यावेळी ते मुबलक पाठवितां येते. इंग्लंडसारख्या सुधारलेल्या राष्ट्रांत सुद्धा एकंदर सर्व चलनी नाण्यांचा विचार केला असतां सैन्याचा उपयोग नाण्याचे काम फारच थोड्या प्रमाणांत करण्यांत येतो. अशा दृष्टीने विचार केला असतां हिंदुस्था- नांतील ही पद्धति खरोखरच इतर राष्ट्रांस आदर्शवत आहे. हे म्हणणें कितपत सयुक्तिक आहे ह्याचा आपण पुढें विचार करूं.

 (३४) सुवर्णगंगाजळी ठेवः-वर सांगण्यांत आलेच आहे की, फौलर कमिटच्या मनांत हिंदुस्थानांत सोन्याचें चलनी नाणे जारीने सुरू करा- वयाचें होतें. ह्या धोरणानुसार हिंदुस्थान सरकारनें साहरिन व अर्धा सान्दरिन प्रचारांत आणण्याची नेटानें खटपट केली; पण तो प्रयत्न सर्वस्खों फसला. १८९९ साली चलनी नोटा २७ कोटी रुपयांच्या प्रचारांत होत्या व ह्या नोटांकरिता