पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ४ था.
विसाव्या शतकाच्या प्रारंभींची चलनपद्धति.

 ३३.सुवर्णविनिमय परिमाणपद्धती'चा प्रारंभ: - पण हळू हळूं हिंदुस्थान सरकारचें धोरण फौलर कमेटानें आखून दिलेल्या धोरणापासून अलग होऊं लागले. हिंदुस्थानांत रुपये पाडण्यापासून होणारा फायदा विला- यतेमध्यें सुवर्णैनिधीच्या नांवाने सरकारी नोटा वगैरेमध्ये अडकावून ठेवणे, सोन्याची नाणी पाडण्याकरितां टांकसाळ सुरू करण्याचें टाळणे; हुंडणावळीचा दर १५३ पेन्सपेक्षां कमी झाला असतांना हुंड्या विकावयास काढणे; सुवर्ण गंगाजळीची चांदीची शाखा स्थापन करणे; त्याचप्रमाणे ह्याच गंगाजळींतून रेल्वेला वगैरे लागणाच्या भांडवलाकरितां व यथील सरकारनें स्टेट सेक्रेटरीवर उलट हुंड्या विकल्या असता त्या हुंडया घेऊन येणाऱ्या खाजगी व्यापाऱ्यांना देण्याकरितां सोन्याचा उपयोग करणे ही सर्व कृत्ये सरकारच्या फौलर कमे- टीचें धोरण बदलवून टाकण्याच्या निश्चयाचे दर्शक होत. फौलर कमेटीच्या मनांत हिंदुस्थानांत सुवर्णपरिमाणपद्धति (गोरुड स्टँडर्ड ) व सोनेरी चलनी नाणें ही दोन्ही सुरू करावयात्री होती. पण पुढे पुढे हे धोरण सुटून गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड द्दी नवीनच चलनपद्धति सुरू करण्यांत आली. ही पद्धत लिंडसेनें सुचविलेल्या योजनेबरहुकूम होती. ह्या पद्धतीने हिंदुस्थानांत जरी सोन्याची नाणी प्रचलित असली तरी मुख्य नाणे चांदीचे असतें व विलायतच्या व्यापा- ज्यांना द्यावयाचे वेळी सोन्याच्या नाण्याचा उपयोग करावयाचा असतो. हिंदु- स्थानांत अमर्याद प्रमाणांत रुपयाचे नाणे कायदेशीर मानिलेलें आहे व हें नाणे सोन्याच्या नाण्यांत पटविण्याची सरकारावर जबाबदारी नसते. सोनें व रुपया ह्यांचा संबंध सरकार ठरवील तो असतो व त्या रुपयांत असलेल्या चांदीच्या किंमतीशीं त्याचा बिलकूल संबंध नसतो. सरकारने ज्या चलनी नोटा सुरू केलेल्या असतात त्याबद्दल रुपयेच लोकांना मिळू शकतात. सरकावर एवढीच