पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

५३


त्या निर्धामध्ये करता येईल. शिवाय ही योजना सुचविण्यांत मुख्य हेतु असा आहे कीं, सोन्याचा उपयोग चलनी नाणी पाडण्यांत न करितां एखादे वेळीं हिंदुस्थानांत निर्गत मालापेक्षा आयात माल जर जास्त आला व त्यामुळे त्या देशाला जर देणे जास्त झाले तर ते फेडण्यांत व्हावा. अशा वेळी हिंदुस्थानांत सोनें आणून पुनः परत विलायतेत पाठविणे म्हणजे नुस्ता द्रव्याचा व कालाचा अपव्यय होय. दुसऱ्या मुद्यावर त्यानें असें उत्तर दिलें कीं, आपल्या योजनेचा हाच विशेष आहे कीं, त्या योजनेत सरकारला ढवळाढवळ करतां येऊं नये. सोन्याचे चलनी नाणें व सुवर्णपरिमाणपद्धाते सुरू करून जे काम होईल तेंच काम आपल्या योजनेप्रमाणे चालल्यास सोन्याच्या चलनी नाण्या- शिवाय नुसत्या सोन्यानें वस्तूंची किंमत ठरविण्याच्या पद्धतीनेंच होईल.

 इतक्या विस्ताराने या योजनेचा विचार करण्याचे असे कारण आहे कीं, हीच योजना पुढे, सरकारनें प्रथम जरी विरोध दर्शविला तरी, त्यानें नकळत स्वीकारली व हीच योजना हल्लीं प्रचलित आहे. असो. तूर्त तरी फौलर कमेटी ने ही योजना त्याज्य म्हणून ठरविली व त्याबद्दल असे कारण सांगितले कीं, ही योजना जर स्वीकारणांत आलो तर हिंदुस्थानला लागणारे भांडवल बाहेरून येथे मिळणार नाहीं. तसेंच हीच योजना कायम व्हावयाची असेल तर हिंदु- स्थानांतील सुवर्ण चलनपद्धतीला नेहमीच इंग्लंडमध्ये ठेवलेल्या सुवर्गनिधीमधल्या पौंडावर (व हे पौंड हिंदुस्थानाच्या मानानें पुरेसे आहेत असे मानतां येत नाही ) अवलंबून रहावे लागणार व हिंदुस्थान सरकारला जे रुपये येथे स्वीकारले जातील त्या रुपयांबद्दल विलायतेंत सोनें पुरविण्याची अमर्याद जबाबदारी स्वीकारावी लागणार. शिवाय हिंदु लोकांची सोन्याचा गुप्तसंचय करण्याची संवय इतकी कांहीं भयंकर नाही की, तिजमुळे ह्या देशांत सोन्याचें नाणें कधींही सुरू करण्यांत येऊं नये.

 ३२. फौलर कमेटीनें केलेल्या सूचना:-फौलरकमेटीने आपला रिपोर्ट १८९९ च्या जुलै महिन्यांत सादर केला व त्या रिपोर्टमध्ये खालील सूचना केल्या :-


  • टीप:- कमेटीचें हे मत वाचकांनी मुद्दाम लक्षांत ठेवावें.