पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
भारतीय चलनपद्धति.

दर इतका कमी असेल की, त्यामुळे रुपये पाडण्याकरितां हिंदुस्थानांत सोनें पाठविण्याचा मोह लोकांस फारसा होणार नाहीं) इंग्लंडची बँक ही रुपयांच्याही हुंड्या विकावयास काढील व व्यापा-यांना येथे खजिन्यावर रुपये मिळू लागतील. त्याचा असा परिणाम होईल की, सोन्याची नाणी हिंदुस्थानांत बाहेरून प्रत्यक्ष न येतां रुपयांचा प्रसार येथे जास्त वाढून व्यापाऱ्यांचे काम भागेल. तसेच ज्या- वेळी हिंदुस्थानांतून बाहेर माल पाठविणान्या व्यापाराला पैसे पाठवावयाचे असतील तेव्हां त्यानें १५३ पेन्स त्या दरानें हुंडया विकत घेऊन त्या इंग्लंडमध्ये पटविल्या म्हणजे त्यांचेंही काम भागेल. लिंडसेचे म्हणणे असें होतें कीं, हिंदु- स्थानांत सोन्याच्या चलनी नाण्याची बिलकूल जरूर नाही. कारण येथें रुपयांतच लोकांचा व्यवहार होत असतो, तेव्हां आपण येथे रुपये भरले असतो आपणांस सोनें लंडनमध्यें मिळतें किंवा लंडन येथे सोनें दिलें असतां येथे आपणांस रुपये मिळतात. असा लोकांस भरंवसा आला (व असा मरंवसा विलायतेत सुवर्णनिधि ठेवला असतां सहज उत्पन्न करिता येईल ) तर सोन्याच्या चलनी नाण्याची जरूरी बिलकूल भासणार नाहीं व रुपयाची किंमतही स्थिरावेल.

 ह्या लिंडसेसाहेबाच्या योजनेला खुद्द हिंदुस्थान सरकार विरुद्ध होतें. ह्या सरकारचें म्हणणें अर्से होते की, तुम्हांला जर लोकांमध्ये तुमच्या नाण्याबद्दल विश्वास उत्पन्न करावयाचा असेल तर ज्या देशांत ते लोक रहातात त्याच देशांत तुम्हाला सुवर्णनिधि ठेवला पाहिजे; पण ह्या योजनेप्रमाणे ज्या लोकांत विश्वास उत्पन्न करावयाचा ते लोक रहाणार हिंदुस्थांत व सुवर्णनिधि असणार विलाय- तैंत. दुसरा मुद्दा असा कीं, ह्या योजनेप्रमाणे चालल्यास सरकारास हुँड- णावळीमुळे उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीवर बिलकूल ताबा ठेवितो येणार नाही. ह्यावर लिंडसेचें असे म्हणणें होतें कीं, हिंदुस्थानांत लोकांचे काम रुपयांनी भागतच आहे. सोन्याची खरी जरूरी विलायतेंतच भासणार. हिंदुस्थानांत जर हा सुवर्णनिधि ठेवला तर तो त्यांतील सोनें सांठ वेण्यांत किंवा दागदागिने कर- ण्यांतच फस्त होऊन जाईल. कांहीं कारणानें सोने सुवर्णनिधींतून काढून घेण्यांत आले तर,तेंच सोनें विलायतेमध्ये असल्यास तर ताबडतोब नवीन सोन्याची भरती