पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

५१


तसेच हिंदुस्थानाप्रीत्यर्थ विलायतेंत जो खर्च होतो तो जर कमी केला व हिंदु- स्थान सरकारच्या राज्यकारभारीत जर काटकसर करण्यांत आली तर हुंडणा- वळीचा प्रश्न सोडविणे सोपें जाईल. शिवाय हुंडणावळीचा भाव जर उतरला तर त्यामुळे निर्गत माल स्वस्त होऊन देशाची भरभराट होईल. त्या पक्षाचा सर्वांत महत्वाचा मुद्दा असा होता कीं, होतां होईल तो सरकारनें कृत्रिम चलनी नाणे सुरूं करूं नये. कारण अशा कुत्रिम नाण्यानें पूर्वी जें नुकसान सरकार सोशित असें तें आतां लोकांच्या शिरावर पडून ते चिरडले जातील.

 (३१) मि. लिंडसेची सूचनाः- त्या कमिटीसमोर इतर तज्ज्ञांच्याही कांहीं सूचना होत्या. त्यांपैकी लिंडसेसाहेबानें केलेली एक योजना विचार करण्या- सारखी होती. ह्या योजनेचा मतलब असा होता कीं, एक सुवर्णनिधि निर्माण करण्यांत यावा व त्याचें नांव 'गोल्ड स्टँडर्ड रिझर्व्ह' असे ठेवण्यांत यावें. तो मुख्यतः लंडनमध्ये ठेवण्यांत यावा; पण ह्या निधीचा कांहीं भाग मुंबई व कल- कत्ता ह्या शहरों रुपयांचे रुपाने ठेवण्यांत यावा. एक कोट पौंडचे १५ वर्षांच्या मुदतीचें लंडनमध्ये कर्ज काढण्यांत यावें; तें इंडिया ऑफिस किंवा इंग्लंडच्या बँकेत ठेवण्यांत यात्रे व लोकांना असे जाहीर करण्यांत यावें कीं, ज्या लोकांना १५,००० रुपये किंवा त्यांहून जास्त रुपयांच्या हुंड्या पौंडाच्याबद्दला एक रुपा- यास १६१६ पेन्स ह्या दरानें हव्या असतील त्यांना त्या सुवर्गनिधि ऑफिसांतून विकण्यांत येतील व जे लोक त्या हुंड्या विस्त घेतील त्यांना त्या मुंबई किंवा कलकत्ता येथील चलनी नोटांच्या ऑफिसांत किंवा हिंदुस्थानांतल्या टांकसा ळीच्या इपीसांत पटवून रुपये घेता येतील. लिंडसेच्या मनानें रुपयांच्या हुंड्या १५ हजार रुपयांपेक्षा कमी रुग्यांकरितां नसाव्या व एक हजार पौंडांहून कमी पौंडांकरतां नसाव्या. त्याचप्रमाणे हुंडणावळीचा जास्तीत जास्त दर १६३६ पेन्स व किमान दर १५३ पेन्स असावा. तसेंच ज्या अर्थी ह्या हुंड्याची मागणी मुख्यतः प्रेसिडेन्सी बँकांकडूनच होणार व त्याच बँकांत एक्सचेंज बँकांतल्या शिलका असणार त्या अर्थी सुवर्णनिधीमध्ये १ कोट पौंड ठेवले असतां पुरे होतील. ज्यावेळीं हुंडणावळींचा दर १६१६ पेन्स होईल त्यावेळी (आणि हा