पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
भारतीय चलनपद्धति.

करावा; ( २ ) देशांत खेळत असलेले रुपये काढून घेऊन रुपयाचा भाव १६ पेन्स कायम ठेवण्याकरितां ते आटवावेत व ( ३ ) ह्या आटविलेल्या रुपयांतून जी चांदी मिळेल ती विकून सुवर्णनिधि वाढवावा. ह्या सूचनांचा इत्यर्थ एवढाच होता की, रुपये प्रचारांतून काढून घेऊन त्यांची किंमत वाढवावयाची व रुपयास १६ पेन्स हा भाव कायम ठेवण्याकरितां त्याच भावाने ह्या सुवर्णनिधीं- तून लागेल तितकें सोनें रुपयाचे बदली द्यावयाचें. त्याच महिन्यांत दुसरा एक ख लेता हिंदुस्थान सरकारनें स्टेट सेक्रेटरीकडे पाठविला. त्यांत त्यानें असें स्पष्ट कळावेलें की, हिंदुस्थानांत रुग्याचें नाणे सुरू करण्याची आपली इच्छा नाहीं; व तुम्हाला जर लोकांची मते मागवावयाची असतील तर ह्या देशांत कोणतें नाणें सुरू करवे ह्या मुद्यावर न मागवितां सोन्याचेच नाणे सुरू करण्याकरितां कोणते उआय अधिक यशस्वी होतील ह्या मुद्यावर तो मतें तुम्ही मागवा. एखादी कमिटी जरी तुमच्याकडून नेमण्यांत आली तरी आपली हरकत नाहीं; पण अशी कमिटी नेमल्यानें व्यर्थ कालातिपात होतो.

 हा खलिता पोचावयाच्या अगोदरच स्टेट सेक्रेटरीने फौलर कमिटी नेमून तिला असे कळविले की, हिंदुस्थान सरकारने केलेल्या सूचना किंवा त्या विष- याला धरून इतर आनुषंगिक प्रश्न व हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या चलन- पद्धति इतक्या प्रश्नांवर कमिटीने आरला रिपोर्ट लिहावा. त्या वेळी कमिटी- समोर अनेक महत्त्वाचे प्रश्न विचाराकरितां आलेले होते; व ह्या चलनी नाण्याच्या प्रश्नावर बरेच पक्ष तयार झालेले होते. एक पक्ष असें म्हणत असे की, हिंदुस्थानांत ज्या अर्थी रुपयाच्या नाण्याकरितां टांकसाळी बंद झालेल्या आहेत त्य. अर्थी सोन्याचेंच नाणे सुरू करण्यांत यावें; कारण त्यामुळे हुंडणा- वळीचा भाव स्थिर राहून व्यापाराची भरभराट होईल व हुंडणावळी वा भाव कमी- जास्त झाल्यामुळे सरकारला सोसावें लागणारें नुकसान थांबेल व हिंदुस्थान व इतर प्रमुख राष्ट्रे ह्यांमध्ये जर एकच धातूचे नाणे असेल तर त्यामुळे व्यापाराची जास्त सोय होईल. ह्या पक्षाला विरोध करणा-या पक्ष चें असें म्हणणे होते की, हिंदुस्थानांत चांदीवें एकच नाणें असणे इष्ट आहे; कारण आजपर्यंत हें नाणे हिंदुस्थानास फायदेशीर झाले आहे व त्यामुळे किंमती स्थिर झालेल्या आहेत.