पान:भारतीय चलनपद्धती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आभारप्रदर्शन.

 आमच्या विनंतीस मान देऊन ना. प्रो. काळे यांनी आम्ही लिहिलेल्या पुस्त काची हस्तलिखित प्रत वाचून, कांहीं महत्वाच्या मार्मिक सूचना करून व आपला अमूल्य वेळ खर्चून आमच्या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली; व आम्हांस जगासमोर ग्रंथकार म्हणून येण्यास उत्तेजन दिले ह्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ॠऋणी आहोत. तसेंच हैं पुस्तक लिहिण्याचे काम आमचे परममित्र श्रीयुत नारायण सिताराम लिमये, बी. कॉम्. मध्यप्रांतांतील इन्कमटॅक्स एक्झॅ- मिनर यांचे अतिशय साहाय्य झालेले आहे; त्यांचे किती आभार मानावे हेच आम्होस समजत नाहीं. असो. सरते शेवटीं आमचे तरुण स्नेही श्रीमंत लक्ष्मण नरसिंगराव हेबळीकर ह्यांनी हा ग्रंथ आपणांस अर्पण करण्यास परवानगी दिल्या- बद्दल त्यांचेही आभार मानणे जरूर आहे. हा ग्रंथ वाचून त्यांत कांहीं सूचना करणे झाल्यास वाचकांनी त्या जरूर कराव्या अशी त्यांना प्रार्थना करून हे आभारप्रदर्शन आम्ही पुरं करितों.

पुणे.
२६.६.२१ }

शंकर गणेश खांडेकर.