पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

 अर्थशास्त्रांतर्गत विषयांवर मराठी भाषेत फारच थोडी पुस्तके आहेत ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. ही उणीव अल्पांशानें तरी भरून काढण्यास रा. खांडेकरांच्या पुस्तकाचें साहाय्य होण्यासारखे आहे, त्याबद्दल संशय नाही. चलन व हुंडणवळ ह्यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे सोपपत्तिक रीतीने मराठी भाषेत उद्घाटन करणे हे काम सेपें नाहीं. त्यामुळे प्रस्तुत पुस्तकांत कित्येक स्थळी दुर्बोधता व भाषेचा ओबडधोबडपणा यांस रखे दोष दिसून आल्यास त्यांत आश्चर्य नाही. रा. खांडेकरांनी विषयाचे विवेचन एकंदरीनें चांगले केले आहे असेच मत होईल, असा आम्हांस भरंवसा वाटतो. योग्प लोका- "श्रय मिळाल्यास ह्याच दिशेने त्यांचे हातून जास्त उपयुक्त कामागेरी होण्या- सरखी आहे.

फर्ग्युसन कॉलेज, पुणे.
२२ जून १९२१ }

वा. गो. काळे