पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
भारतीय चलन पद्धति.

त्रिकालाबाधित आहे असे मानणे चुकीचें होईल. कधी कधीं हुंडणावळीचा भाव उतरणें हें देशादेशांतल्या व्य पाराला नुकसानीचें असतें व बाहेरचा माल देशांत कमी प्रमाणांत येऊ लागतो. मुद्याची गोष्ट आपण जी विसरतों ती ही कीं, देशादेशांतला व्यापार म्हणजे विकाऊ मालांची नुसती अदलाबदल असून, जिन्नस उत्पन्न करण्यास लागणाऱ्या सापेक्ष किंमतीवर अवलंबून असतो. वा व्यापाराचा संबंध त्या देशांतल्या वस्तुंची किंमत ठरविण्याच्या प्रमाणावर बिलकूल नसतो. एकच माल एखाद्या देशांत उत्पन्न होण्यास जो खर्च लागतो तोच माल दुसन्या देशांत उत्पन्न होण्यास जर कमी खर्च लागेल तर त्या देशाला तो माल स्वस्त भावानें विकतां येईल. तेव्हां व्यापार हा जिनसा उत्पन्न करण्यास लाग- णाऱ्या सापेक्ष किंमतीवर अवलंबून असतो ही गोष्ट आपण विसरता कामा नये. अशा दृष्टीने विचार केला असतां हिंदुस्तानचा निर्गत माल हुंडणावळीच्या दरःवरच सर्वस्वी अवलंबून नाहीं. येथें जो ताग किंवा चहा उत्पन्न होतो तसा ताग किंवा चहा इतर देशांत इतक्या स्वस्त किंमतींत होणे शक्य नाही. तेव्हां परदेशांची ह्या मालाला, तुमचा हुंडणावळीचा भाव कांहीही असो, मागणी असणारच व ह्या मलाबद्दल ते कापड, लोखंड, पोलाद वगैरे वस्तु ह्या देशांत जरूर पाठवितील. असो. ह्या वेळची परिस्थिति लक्ष्यात घेतां ह्या उत्तरलेल्या हुंडणावळच्या भावामुळे हिंदुस्तानाला परराष्ट्रीय व्यापारीत फारसा फायदा झाला नाही. कारण हुंडणावळीचा भाव उतरल्यामुळे जो कांहीं जास्त पैसे मिळून नफा व्हावयाचा तो नफा आयात मालाची किंमत जास्त द्यावी लागल्यामुळे उडून गेला. असो. सांगावयाचे तात्पर्य है कीं, हुंडणावळीचा भाव स्थिर असला तरच देशाच फायदा असतो; त्यामुळे देवघेवांत व व्यापारीत अनिश्चितपणा रहात नाही व जमाखर्चाचे बंद जपत्रक करण्यास सोयीचें असतें. हा भाव स्थिर नसल्यामुळेच हिंदुस्तान सरकारला जादा कर बसवावे लागले व तो भाव स्थर झाल्यावरही एकदां बसविलेले कर कमी करण्याचे सरकारच्या जिवावर येऊन लोकांस विनाकारण जास्त पैसे द्यावे लागत आहेत.

 (३०) फौलर कमेटीची नेमणूकः-वर आपण पाहिलेंच आहे कीं, लोकांना नाणी पाडून घेण्याकरतां टांकसाळी बंद झाल्यामुळे रुप्याची सोन्यांत