पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

४७


कीं, चांदीची किंमत व रुपयाची किंमत ह्यांत तफावत पडली व रुपया हा हिंदुस्थानांत जरी चलनं नाणे म्हणून कायम राहिला तरी हिंदुस्थानाबाहेर त्याला किंमत राहिली नाहीं. सोने मात्र अजूनही कायदेशीर नाणे म.नलें गेले नाहीं.

 खाजगी रीतीने लोकांची नाणी पाडण्याचे सरकारी टांकसाळीनी जेव्हां नाकारलें त्यावेळी हुंडणावळीचा भाव १४॥ पेसवासून एकदम १६ पेन्सवर गेला; पण हा चढलेला भाव सट्टेबाजीच्या स्वरूपाचा असल्यामुळे तो तसाच टिकेल हे मात्र शक्य नव्हते. सट्टे करण्याच्या हेतूनें लोकांनी पुष्कळच चांदी हिंदुस्थानांत आणल्यामुळे व टांकसाळी बंद होण्याचे सुमारास लोकांनी पुष्कळच रुपये पाडून घेतल्यामुळे १८९३ सालानंतर कांहीं वर्षे नवीन रुपये पाडण्याची सरकारास जरूर वाटली नाही. तरीपण देशांत चांदी मेठ्याच प्रमाणांत येत होती त्याचे कारण असे की, हिंदुस्थानाच्या आयात मालपेक्षां निर्गत माल जास्त होता. पण अशी चांदी जास्त येईल अशी खुद्द स्टेट सेक्रेटरीचाही कल्पना नव्हती. त्या चांदीचा उपयोग टांकसाळी बंद झाल्यामुळे दागदागिने करण्याकडे होऊं लागला. ह्यावेळी परिस्थिति अशी होती की, टांकसाळी बंद झाल्यामुळे एक तोळा चांदीच्या किंमतीपेक्षां एक तोळा रुपयाच्या नाण्याची किंमत जास्त हे तो; व बाजार मंदी असल्यामुळे १५ आण्यांला एक तोळामर चांदी विकत घेणे हा कदाचित् आंतबट्टयाचा व्यवहार होईल हे सामान्य माणसाला समजत नव्हतें. ज्यावेळीं दुदैवानें स्टेट सेक्रेटरीने हुंड्या विकावयाचें तहकूब केले त्याच वेळी ही स्थिति निर्माण झाली. त्यामुळे चांदीच्या खरेदीला ऊत आय. टांकसाळी बंद करण्याचे वेळी दोन वाईट गोष्टी घडून आल्या:- पहिली गोष्ट म्हणजे स्टेट सेक्रेटरीने आपल्या हुंड्या कमी प्रमाणांत विकण्याचे ठरविले व सोन्याच्या किंमतीने व्यक्त होणारा चांदीचा भाव खूपच उतरला.

 (२९) एका भ्रामक समजुतीचें निराकरणः - ह्यावेळी लोकांचा असा एक समज होता की, हुंडणावळीचा भाव उतरला म्हणजे निर्गत मालाची वाढ होते व त्यामुळे एकंदरीत देशाचा फायदाच होतो. अर्थशास्त्रांतलें हे तत्व सामान्यपणे खरें आहे. पण हे तत्व गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे