पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
भारतीय चलनपद्धति.

जगांतील निम्मी राष्ट्र सोन्याची नाणी वापरतात व बाकीची राष्ट्रे चांदीची नाणी बापरतात. त्या दोन्ही नाण्यांपैकी एक नाण्याची किंमत कमीजास्त झाली की ताबडतोब पदार्थोच्या किंमतीवर परिणाम होऊन जगाच्या व्यापारावरही ताबडतोब परिणाम होतो. हा जर दोष टाळावयाचा असेल तर ही विचलन- पद्धतीच चोहोकडे सुरू झाली पाहिजे.

 कदाचित् कोणी अशी शंका घेईल की, द्विचलनपद्धति यशस्वी होण्याला लागणारी जी मुख्य अट को, सर्व राष्ट्रांनी एकमतानें ही पद्धत अमलांत आण- ण्याचे ठरविलें पाहिजे ती अट साध्य होणार कशी ? पण ही अट जितकी अशक्य वाटते तितकी नाहीं. एकसमयावच्छेदेकरून व एकाच पद्धतीवर जर सर्व राष्ट्रांनी वागण्याचें ठरावेलें तर ही गोष्ट अगदी अशक्य नाहीं. सर्व राष्ट्रांनी जर सोन्यारुप्यांत एक ठराविक प्रमाण ठरविले व दोन्ही धातूंच्या नाण्यांकरता टांकसाळी खुल्या ठेविल्या तर ही पद्धत सुरू करणे अवघड जाणार नाहीं. असो. पण इतके जरी फायदे त्या पद्धतोपासून मिळणारे होते तरी इंग्लंडने आपल्या पेढ्यांच्या मुरवतीस्तव आपली संमति न दिल्यामुळे ही द्विचलनपद्धति अमलांत येऊं शकली नाहीं. ह्याचा परिणाम असा झाला की, जगांतील प्रमुख राष्ट्रांस सोन्याचें नाणेंच कायम करावे लागलें, चांदीचें नाणें चिल्हर कामा- करितां उपयोगांत आणावें लागलें व ही नाणीं किती पाडावयाची त्यावर आपला ताबा ठेवून सोने व चांदी त्यांचे परस्परसंबंध कायम ठेवावे लागले.

 (२७) हिंदुस्थानसरकारच्या अडचणी:- आतापर्यंत आपण विषयांतर करून द्विवलनपद्धति म्हणजे काय आहे ह्याचा विचार केला. वर आपण पाहिलेच आहे की, हिंदुस्थान सरकारने १८७५ साली आपले निश्चित धोरण काय राहील हैं जाहीर केलेच होतें. पण ज्या वेळी ही द्विचलनपद्धति नामशेष होणार हे निश्चित झाले तेव्हां हिंदुस्थानांत चांदीचा भाव एकदम उतरूं लागला. कारण बहुतेक देशांतून चांदीचे उच्चाटन होऊन ती हिंदुस्थानांत जास्त प्रमाणांत येऊं लागली. १८३५ सालापासून १८९९ सालापर्यंत हिंदु- स्थानांत मुख्य नाणें चांदर्चेिच होतें. पण ह्या सालानंतर ते जाऊन सोन्याचे नाणे