पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

४३


सांठविले जाते किंवा परदेशांच्या व्यापाऱ्यांकडे मालाच्या किंमतीबद्दल पाठ- विले जाते. तेव्हां द्विचलनपद्धति जर यशस्वी व्हावयाची असेल तर सर्व राष्ट्रांनी ऐकमत्य केल्यास ती यशस्वी होईल व सर्व राष्ट्रांनी तिचा स्वीकार करावा अशा- बद्दल फ्रान्स, अमेरिका वगैरे 'लॅटिन लीग्' ह्या संघामध्ये असलेल्या राष्ट्रांनी अनेक वेळां परिषदा भरवून खटपट केली; पण ह्या खटपटीस मुख्यतः इंग्लंड- कडूनच विरोध करण्यांत आला. इंग्लंडचे म्हणणे असें कीं, 'सोन्याचें नाणे सोडून सोन्यारुप्याचीं दोन्ही नाण जर कायदेशरे मानण्यांत आली तर त्या- मुळे होणारे स्थित्यंतर 'भयंकर ' होईल; त्याचप्रमाणे आष् हैं देशांत भसलेल्या सोन्याच्या नाण्यावरच अवलंबून आहे व ही गोष्ट जर्मनी देशालासुद्धां पटून त्या देशांत आपलेच धोरण स्वीकारण्यांत आले आहे. तेव्ह आपण जर द्विचलनपद्धति सुरू केली तर आपल्या व्यापारास धक्का बसेल. त्याचप्रमाणे आपला देश हा धनको देश आहे व त्याला परराष्ट्रांकडून जे व्याज आजपर्यंत सोन्याचे नाण्यांत मिळत आहे तें आतां किंमत उतरलेल्या चांदीच्या नाण्यांत आपणाला घ्यावे लागेल व त्यामुळे आपला मोठाच तोटा होईल, पण इंग्लंडनें ही पद्धत न स्वीकारण्याचे मुख्य कारण असे होते की, बँका व इतर पैशाचा व्यवहार करणाऱ्या संस्था ह्या चांदीची किंमत कमी झाल्यामुळे सोन्याऐवज तिचा मोबदला स्वीकार करण्यास कबूल होईनात.

 वास्तविक पाहिले असतां इंग्लंडचा हा विरोध निष्कारण होता व त्या देशानें सांगितलेली विरोध करण्याची कारणे तितकी सयुक्तिक दिसत नाहीत. शिवाय ही द्विचलनपद्धति जर सुरू करण्यात आली असती तर त्यापासून कांहीं फायदेही झाले असते. उदाहरणार्थ, त्या पद्धतीने दोन्ही धातूंचीं नाणों जर निय व्यवहारांत विनशर्त उपयोगांत आली तर जगांतील पेढ्यांना आपल्या जवळ असलेल्या शिलकीची व्यवस्था अधिक सुलभ रीतीने करता येईल व जगांत जें सोन्याला फाजील महत्त्व आहे व त्यामुळे त्याचा संचय करण्याकडे जी विशेष प्रवृत्ति दिसून येते. ती दिसून येणार नाहीं. त्याचप्रमाणे त्या पद्धतीमुळे पररा- ट्रांशी होणारे पैशाचे व्यवहार जास्त सुलभ होतील व दोन देशांच्या हुंडणा- बळीच्या भावांत फारसा फरक राहणार नाही. आपला असा अनुभव आहे की,