पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
भारतीय चलनपद्धति.

बद्दल बरीच चर्चा करण्यांत आली. कांहीं राष्ट्राचे असे मत बनत चालले होतें कीं, जर सर्वं राष्ट्रांनी एकमतानें ही द्विचलनपद्धति स्त्रीकारली तर ती यशस्वी होणें शक्य आहे. पण ब्रूसेल्स येथे १८९२ साली परिषद् भरून तेथें जेव्हां सर्व राष्ट्रांचे एकमत होईना व इंग्लंदने आपलाच हट्ट चालवन एकचलनपद्धति अंमलांत आणण्याचा निश्चय जाहीर केला तेव्हां ह्या द्विचलनेपद्धतीवा अशक्य- पणा स्पष्ट होऊं लागला व हिंदुस्थानांत रुप्याच्या किंमतीसंबंधानें कांहीं तरी निश्चित धोरण स्वीकारलें पाहिजे असे येथील सरकावस वाटले.

 ह्या ठिकाणी द्विचलनपद्धती बद्दल थोडी माहिती सांगितली असतां ती अप्र- स्तुत होणार नाही असे वाटते. देशांत जर एकच चलनपद्धति असेल तर त्याचा असा परिणाम होतो की, ज्या धातूचें नाणें प्रचलित असेल त्या धातूची किंमत जर कमीजास्त झाली तर ताबडतोब त्या किंतीच्या फरकाचा व्यापारावर परिणाम होतो. वास्तविक पाहिलें असतां कोठल्याही देशांत एकाच धातूच्या नाण्यावर तेथील सरकारने अवलंबून राहूं नये. अशा प्रकारें विचार केला असतां बहुचलनपद्धति हीच श्रेयस्कर व तात्विक दृष्टया श्रेष्ठ आहे. अयो; सध्यां आपणांस द्विचलनपद्धतीचाच विचार कर्तव्य आहे. ज्या वेळी सोनें व चांदी ह्या दोन्ही धातूंची नाणी व्यवहारांत व सरकारदेण्यांत बिनशर्त स्वीका- रण्यांत येतात त्या वेळों द्विचलनपद्धति प्रचलित असते. हह्रीं हिंदुस्थानांत जरी मोनें व चांदी ह्या धातूंची नाणीं उपयोगांत आहेत तरी हिंदुस्थानच्या अंत- व्र्व्यवहारांत मुख्यतः रुपयाच प्रचार आहे व परराष्ट्रीय व्यवहारांत सोन्याच्या नाण्याचा प्रचार आहे; त्यामुळे त्या देशांत द्विचलनपद्धति आहे असे म्हणतां येत नाहीं. ज्या देशांत ही पद्धति चालू करण्याची खटपट करण्यांत आली तेथे तेथील सरकारास मुख्य अडचण अशो आली कों, सोनें व चांदी ह्यांच्या मूळ किंमतींत म्हणजे बाजारांत ठरगाच्या व सरकारानें कायद्याने ठरविलेल्या नाण्याचे किंमतीत सादृश्य कसे सांभाळावयाचें ? त्या दोन धातूंच्या नाण्यांच्या दुहेरी किंमतींत जर फरक पडूं लागला तर ज्या नाण्याची किंमत उतरली असेल ते नाणें ग्रेशॅम सहेबाने शोधून काढलेल्या नाण्यांच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या नाण्यास कूिन देतें व एक तर तें आटविले जाते किंवा लोकांकडून