पान:भारतीय चलनपद्धती.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

४१



) २) सरकारने कायदा करून तशीं तो मानण्याबद्दल खटपट करावी. ( ३ ) सोने च चांदी ह्यांच्या परस्पर किंमतीचे प्रमाण काय असावें हैं निश्चित करण्या- करतां एक कमिशन नेमण्यांत यावें. ( ४ ) हे कमिशन नेमीपर्यंत हिंदुस्थानांत जास्त सोने आणण्याबद्दल जुजबी उपाय योजण्यांत यावेत.

 तसेंच त्या वेळच्या फडणविसाने त्या वेळच्या बंगालच्या बँकचे सेक्रेटरी मि. डिक्सन ह्यांच्याही सूचना सरकारकडे पाठवून दिल्या. त्या सूचनांचा मति • ताथै एवढाच होता की, सरकारने लोकांना हिंदुस्थानाच्या खजिन्यांत इंग्लिश व आस्ट्रेलियन साहरिन, सरकार देगें म्हणून, किंवा रुप्याच्या बदला म्हणून बिनशर्त आणून देण्यास परवानगी द्यावी. तसेंच चलनी नोटांच्या कायद्याच्या कलमाला अनुसरून जे लोक टांकसाळीत ठराविक नंबराचें १० रुपयांकरतां १२० ग्रेन वजनाचें सोने आणून देतील त्यांना नफा न घेतां सोन्याच्या मोब- लदा नोटा काढून याव्या. सर रिचर्ड टेंपलसाहेबाने आपल्या सूचना पुनः एकदां सरकारासमोर मांडल्या. ह्या चळवळीचा एकंदर परिणाम असा झाला कीं, १८७४ साली हिंदुस्थान सरकारने एक ठराव प्रसिद्ध केला व त्यांत आपले धोरण व्यक्त केलें. तें असे की, एकंदरींत विचार करतां हिंदुस्थानांत सोन्याचें नाणे सरीस सुरू करणे सध्यांच्या परिस्थितीत शक्य आहे असे सरकारास वाटत नाहीं. तरीपण डिकसनसाहेबाची दुसरी सूचना सरकारास मान्य आहे.

 (२६) लॅटिनलीग व द्विचलनपद्धति : - आतांपर्यंत चलनी नाण्याच्या इतिहासाच्या दुसऱ्या भागाचें विवेचन झाले. आतां ज्या भागाचें विवेचन करावयाचें तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे; कारण ह्या भागांत चलनी नाण्य. संबंधानें बन्याच महत्वाच्या गोष्टी घडून आल्या. ह्या काळांत ह्याविषया- संबंधानें सरकारने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्राचें जर आपण पर्यालोचन केले, तर आपणांस एक गोष्ट अशी दिसून येईल कीं, सरकारनें झा काळांत बरेंच पांढऱ्याचे काळे केले; पण प्रत्यक्ष कृति अशी फारच थोडी केली. जरी १८७४ सालापासून सोने व चांदी त्यांच्या किंमतीत विलक्षण फरक पडला होता तरी १८९३ पर्यंत सरकारने ह्या बाबतीत कांहींच इलाज केले नाहीत. तथापि सरकारवतीने जर कांही सांगतां येईल तर ते हें कीं, त्या काळांत द्विचलनपद्धति.