पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
भारतीय चलनपद्धति.

विसाचें मत हिंदुस्थानांत सोन्याचें नाणें सुरू करावें असेंच होतें. ह्या वेळेचा हिंदुस्थान सरकारनें विलायत सरकारशी केलेला पत्रव्यवहार व हिंदुस्थानसरका- रशी कलकत्ता, मुंबई, मद्रास येथील चेंबर आफ कामर्स' व हिंदी व्यापा- ज्यांची मुंबई व कलकत्ता येथील सभा त्यांनी केलेला पत्रव्यवहार जर आपण चाळून पाहिला तर आपणास हेच दिसून येईल की, ह्या सर्व संस्थांचें व हिंदुस्थ नसरकारचें हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करण्याचे बाबतींत ऐक- मल्य होते. पण मुख्य अडचण अशी होती की, विलायतसरकार व त्याच्य ताब्यांत असलेला स्टेट सेक्रेटरी हे ह्या कृत्याला प्रतिकूल होते.

 (३५) सररिचर्ड टेंपल व डिकसनच्या सूचना:- ह्याच वेळी युरोपखंडांत चलनी नाण्याबद्दल जारीने चर्चा चाललेली होती. १८६७ साली पॅरिस येथें यूरोप व अमेरिका येथील १८ राष्ट्रांची एक परिषद् भरली होती. ह्या परिषदेने असा ठराव केला कीं, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्यें सोनें हीच धातु सोयीची आहे व एकचलनपद्धतीचाच सर्व राष्ट्रांनी स्वीकार करावा व ज्या अर्थी सोन्याला जास्त मागणी येऊन ते दिवसानुदिवस जास्त दुर्मिळ होत जाणार त्याअर्थी ज्या राष्ट्रांत रुप्याचेंच नाणें अगोदरच सुरू आहे किंवा द्विचलनपद्धति प्रचारांत आहे त्या राष्ट्रांत ह्या दोन धातूंच्या किंमतीत असा संबंध रहावा की, त्यामुळे त्या देशांत सोन्याचा प्रसार फारसा होऊं नये.

 १८७० साली मागील सर्व कायद्यांचे एकीकरण करून हिंदुस्थान सरका- रखें ' हिंदुस्थानांतील नाण्याचा कायदा पास केला; ह्या चलनीनाण्याच्या इति हासाच्या दुसऱ्या भागाच्या शेवटल्या कालांत दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. पहिली गोष्ट अशी की, त्याच वेळी सोन्याच्या किमतीने व्यक्त होणारी रुपयाची किंमत उतरूं लागली व दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याचे नाणें प्रचलित करण्याचे प्रयत्न पुनः सरकारनें केले ही होय.

 १८७२ साली सर रिचर्ड टेंपलसाहेबानें एक विस्तृत खलिता हिंदुस्थान ससरकारापुढे मांडून कांहीं सूचना केल्या. त्या अशा:- ( १ ) १५, १०, व ५ रुपयांची नाणी हिंदुस्थानांत आहेत, पण ती कायदेशीर मानली जात नाहींत.