पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)

साव्हरिनची बाजारांत १७ रुपये किंमत आहे. अशा रीतीनें हिंदी चलनपद्ध- तीची घडी विसकटून गेली तो सरकारच्या प्रयत्नानेंहि पूर्वस्थितीस आलेली नाही, त्यामुळे सामान्य माणसाचीहि जिज्ञासा प्रदीप्त होणे साहजिकच आहे. चलनाच्या बाबतीत झालेल्या घडामोडीमुळे कित्येक व्यापारी वगैरे लोकांचा तात्कालिक फायदा झाला तर दुसऱ्यांचें पुष्कळ नुकसान झाले आहे व पर- राष्ट्रीय व्यापार जवळ जवळ बंद पडला आहे. तेव्हां ह्या सर्व गोष्टींच्या मुळाशों काय आहे, हिंदी चलनपद्धति कोणत्या प्रकारची आहे आणि तिची सुधारणा कशी केली पाहिजे ह्या प्रश्नांची उत्तरें सामान्य बुद्धीच्या माणसांस समजतील अशा रीतीनें देगें आवश्यक झाले आहे. विषय अवघड आणि गुंतागुंतीचा असल्यानें त्याचें सोप्या भाषेत विवेचन होऊन तें जनतेस सहज उपलब्ध होण्याची विशेष जरूर होती. हे काम माझे तरुण मित्र, रा. खांडेकर यांनी पुष्कळ परिश्रम घेऊन निव्वळ मराठी भाषा समजणारांसाठी केले आहे त्याबद्दल ते स्तुतीस पात्र असून त्याचे अभिनंदन करणे आवश्यक आहे.

 हिंदी चलनपद्धतीची मोडणी आणि तिच्यासंबंधाचे साधकबाधक विचार समजण्यास अगेदर धातूंची नाणी, कागदी चलन, परराष्ट्रांवर व्यापाऱ्यांनी काढ हुंड्यांची देवघेव ह्य संबंधाची मूलतत्वें नीट समजली पाहिजेत. ह्यासाठी रा. खांडेकरांनी आपल्या पुस्तकांतील विवेचनाची यथोचित मांडणी केली आहे. युरोपियन राष्ट्रांत झालेल्या चलनात्मक घडामोडींची थोडक्यांत हकीकत सांगून त्यांनी हिंदी चलनपद्धतीचा संगतवार इतिहास दिला आहे. सदरहू पद्धतीची फोड करतांना पुस्तककर्त्यांने तिच्यामधील दोषांचें मार्मिक रीतीनें आविष्करण केले आहे; आणि हिंदी सरकारचे चलनविषयक धोरण सदोष असल्याबद्दलचा भरपूर पुरावा पुढे मांडला आहे. ह्या बाबतीत खुद्द अर्थशास्त्रज्ञांमध्येच ठळक मतभेद आहेत; तथापि गेल्या चारपांच वर्षांच्या अनुभवावरून हिंदी चलन. पद्धतीमधला कृत्रिमपणा नाहींसा झाला पाहिजे त्याविषयीं एकमत झाल्या- सारखे दिसत आहे. ते कांही असले, तरी हिंदी लोकांच्या दृष्टीने ह्या देशांत पाश्चात्य राष्ट्रांच्या चलनपद्धतीसारखी पद्धति स्थापित होण्याची आवश्यकता निर्विवाद सिद्ध झाली आहे.