पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

३९


प्रचारांतून जात चाललें. तरी मधून मधून सोन्याच्या नाण्याचा प्रचार करण्याचे प्रयत्न सरकार करीतच होते. त्याच वर्षी सोन्याची नाणी पाडण्यांत यावीत असे सरकारने ठरविले. १८४१ साली सरकाराने एक जाहिरनामा काढला व १५:१ अशा प्रमाणांत असलेल्या सोन्याच्या मेहरा जर लोकांनी खजिन्यांत आणिल्या तर त्यांचा स्वीकार अधिकाऱ्यांनी करावा असा हुकूप सोडला. अशा रीतीने सरकारी देणे देतांना लोकांनी सोन्याच्या नाण्यावा उपयोग करावा असे जरी सरकार ने प्रयत्न केले तरीपण लोकांमध्ये ह्या सोन्याच्या नाण्याचा फारसा प्रसार झाला नाहीं. इतकेंच नव्हे तर सोन्याचे नाणे लोकांच्या दृष्टीने पाहतां खरें नाणेंच नव्हे असा उल्लेख सरकारी कागदोपत्री सांपडतो.

 १८४७ सालानंतर कॅलिफे रनिया व आस्ट्रेलिया त्या देशांत सोनें मुबलक पडल्यामुळे सोन्याची किंमत रुप्याच्या मानाने उतरूं लागली. त्यामुळे अर्था- तच लोक सरकारसारा सोन्याच्या नाण्यांत देऊं लागले व सरकाराला आपला १८४१ सालचा जाहिरनामा परत घ्यावा लागला. तरीपण एवढी गोष्ट खरी आहे की, सोन्याची किंमत जितकी उतरेल असे सरकारास वाटले होते तितकी न उतरल्यामुळे पुनः सोन्याची नाणी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

 १८५९ साली हिंदुस्थानच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने एक महत्व ची गोष्ट घडून आली. ती अशी कीं, फडनविशी खातें प्रथमच निर्माण होऊन त्यावर वुइलसनसाहेबाची नेमणूक झाली व हिंदुस्थ नसरकारच्या जमाखर्चाला व्यवस्थित वळण लागलें व त्याच साहेबाच्या कारकीर्दीत हिंदुस्थानांत चलनी नोटा सुरू करण्यांत येऊन लवकरच त्याचे पश्चात एक कायदा करण्यांत आला. पण हिंदुस्थानांत सोन्याचें नाणें सुरू करण्याचेविरुद्ध हा साहेब होता व त्याच्याच मताची री सर चार्लस वूडनें ओढली. तो आपल्या खलित्यांत म्हणतो हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करण्याबद्दल खटपट करणें विलायत सरका- राला इट वाटत नाही त्याचे कारण लोकांच्या गरजा चलनी नोटांनीच जास्त भागतील अर्से त्या सरकारास वाटतें.

 असो. एकट्या विलसनसाहेबाशिवाय त्या काळांतल्या प्रत्येक फडन-