पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
भारतीय चलनपद्धति.

कारास बदलावा लागला. चलनी नाण्याच्या इतिहासाचे असे हे सद्दा भाग स्थूलमानानें होतात. याच भागांचा आपण आतां विस्तारानें विचार करूं.

 (२४) सोन्याचे नाणे सुरू करण्याबद्दलचे सरकारी प्रयत्नः - वर म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानांत सोन्यारुप्याची शैकडों नाणीं अस- त्यामुळे त्यांचा एकमेकांशी बिलकूल संबंध नसे. उत्तर हिंदुस्थानांत रुपयाचें नाणे विस्तृत प्रमाणांत चालू होतें व सोन्याची मोहोर ही पुरवणीवजा होती. पण दक्षिण हिंदुस्थानांत ह्याच्या उलट स्थिति होती. असा फरक असण्याचें हें कारण दिसतें कीं, दक्षिणेत मुसलमानांचा अम्मल दृढमूल झालाच नाहीं त्या- मुळे त्यांच्या नाण्यांचा प्रसार त्या भागांत फारसा झाला नाहीं. एवढी मात्र गोष्ट खरी कीं, हिंदुस्थानांत सोन्याची व रुप्याची दोन्हीं नाणीं सर्रास चालू होती. अठराव्या शतकाच्या अखेरीस कंपनी सरकारास हीं नाणीं रद्द करून सर्व हिंदु- स्थानांत एक नाणे चालू करण्याची जरूर भासूं लागली. १८०६ साली विला- यतेंतील कोर्ट आफू डायरेक्टरनें मद्रास सरकाराला एक खलिता लिहिला. ह्या. खलित्यांत डायरेक्टर असे स्पष्ट लिहितात की, हिंदुस्थानांत संपत्ति मोजण्याचे साधन म्हणजे नाणें हें एकाच धातूचें असले पाहिजे; मग तीं धातु सोनें असो किंवा रुपें असो. हिंदुस्थानची परिस्थिति ध्यानांत घेतां रुप्याचेंच नाणे लोकांस जास्त फायदेशीर होईल हे उघड आहे. तरीपण सोण्याचें नार्णेही लोकांमध्ये सुरू असावें अशी आमची इच्छा आहे. ह्या दोन्हीं नाण्यांचें वजन १०० प्रेन असावें व त्यांपैकी १६५ ग्रेन शुद्ध चांदी किंवा सोनें असावें व १५ प्रेन तांब्या- सारख्या इतर धातूची भेसळ असावी. ह्या मुख्य नाण्याशिवाय अर्धा रुपया क पान रुपया हीं नाणी सोन्याचीं व रुप्याचीं असावीत; व दोन्हीं धातूंच्या नाण्यांचें वजन, सफाई व नांव सारखींच असावीत.

 पण ही सोन्याचा रुपया सुरू करण्याची डायरेक्टरांची इच्छा कागदो- पत्रींच राहिली, कारण १८१८ सालों मद्रास इलाख्यांत सोन्याच्या नाण्याचे- ऐवजी रुप्याचें नाणें सुरू करण्यांत आलें व १८३५ सालीं सर्व हिंदुस्थानभर १८० प्रेम वजनाचें रुप्याचें नाणें प्रचलित करण्यांत आलें व सोन्याचें नाणें