पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

३७


अम्मल सुरू होण्यापूर्वी त्या देशांत सोन्याची व रूप्याची मिळून ९९४ नाण सुरू होतीं. अशी शेकडों नाणीं प्रचारांत असण्याचे मुख्य कारण असें होतें कीं, नाणी पाडणें हें सार्वभौम सत्ता दर्शविण्याचे एक अंग समजले जाई व सार्वभौम राजे व मांडलिक राजे आपल्या नांवाच नाणी पाडून आपले वैभव प्रकट करण्यास उत्सुक असत. दुसरा भाग १८३५ पासून सुरू होऊन १८७४ साली समाप्त होतो. त्या साली एक ठराव सरकारनें केला. ह्या काळांत सोन्याच नाणीं सुरू करण्याबद्दल प्रयत्न झाले. तिसरा भाग १८७४ सालापासून सुरू होऊन १८९३ साल संपूर्ण होतो. या काळांत हुंडणावळीच्या भावांत बरेच फेरफार होऊन त्यापासून लोकांस बराच त्रास भोगावा लागला व त्यामुळे चलनी नाण्याच्या पद्धतीत कांहीं तरी सुधारणा व्हावी एतदर्थ जोराचे प्रयत्न सुरू झाले. चवथा भाग १८९३ पासून सुरू होतो व १९२० साली तो संपतो. या कालांत लोकांना रुप्याची नाणीं सरकारी टांकसाळीतून पाडून घेण्याची बंदी झाली व सोन्याचे नाणे हिंदुस्थानांत सुरू करण्यांत आले. त्याच कालांत हर्शल कमिटी व फौलर कमिटी नेमण्यांत येऊन त्या कमिटींनीं केलेल्या महत्वाच्या सूचना मंजूर करण्यांत आल्या. ह्यापुढे विसाव्या शतकांतील चलन पद्धतीच्या इतिहासाचे आपणांस आणखी दोन भाग म्हणजे सवै मिळून सहा भाग करता येतील. व त्यापैकी पांचवा भाग १९९० पासून १९१३ पर्यंतचा होय. त्या कालांत हिंदुस्थानांत १९०७-८ साली दुष्काळ पडून निर्गत मालापेक्षा आयात माल जास्त प्रमाणांत आला व हिंदुस्थानांतील सरकाराला विलायतेंतील स्टेट सेके- रीवर उलट हुंड्या विकण्याचा प्रसंग येऊन विलायतेमध्यें ठेवलेल्या सुवर्णनिधीला ओहटी लागली व प्रवलित चलनपद्धति सदोष आहे किंवा निर्दोष आहे व हिंदुस्थानांत टांकसाळ सुरू करून सोन्याची नाणी सुरू करावी किंवा नाहीं त्या प्रश्नावर बरीच भवति न भवति झाली; व १९१३ साली चेंबरलेन कमिशन नेमलें गेलें. सहावा भाग म्हणजे युद्धकालीन भाग होय. सर्वच जगांत त्या युद्धाने व्यापरांत भयंकर घडामोड उत्पन्न केल्याने चलनी नाण्याचा प्रश्न पुनः उपोस्थत होऊन बॅबिंग्टन कमिशन नेमले गेले व हुंडण | बळीचा भाव सर-