पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

भारतीय चलनपद्धति.


गति झपाठ्यानें सुरू होते. नाणे काय किंवा नोटा काय ह्या विनियम साधन म्हणून व्यापाराचे सोयीकरितां सुरू करावयाच्या असतात; सरकारी उत्पन्नाची बाब म्हणून नव्हें; व अशा रीतीने वाजवीहून फार्जल प्रमाणांत नोटा एकदां सुरू करण्यांत आल्या म्हणजे राष्ट्राचा विनाशकाल जवळ आला म्हणून समजावें.

 असो. आतापर्यंत आपण चलनाच्या मूलतत्त्वांची चर्चा केली. आतां आपणांस हिंदुस्थानांत जी चलनपद्धति प्रचारांत आहे ती प्रथम अस्तित्वांत कशी आली, त्या पद्धतीचे कोणते परिणाम हिंदुस्तानच्या सांपत्तिक स्थितीवर घडून आले व येत आहेत व त्या पद्धतीसंबंधानें कोणत्या सुधारणा करणे इष्ट आहे वगैरे मुद्यांची सांगोपांग चर्चा करावी लागेल. तो चर्चा वाचण्यास वाच कांनी सावधान चित्त असावे अशी प्रेमाची सूचना करून ही तात्विक चर्चा येथे आटपती घेतों.

भाग ३ रा.
-:-X●X-!-
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.


 १९ व्या शतकांतील चलनपद्धतीच्या इतिहासाचे बरोबर चार भाग करता येतील. पहिला भाग १८३५ सालापर्यंतचा होय. त्या वर्षी सरकारने एक कायदा करून सर्व हिंदुस्थानाकरतां रुपयाचे नाणे प्रचलित करण्याचा ठराव केला. हिंदुस्थान देश अवाढव्य असल्यामुळे ह्या देशांत एकछती राज्ये फार थोडी असत व त्यामुळे सर्व देशभर एकच नागें सुरू होणे शक्य नव्हते. हिंदु- स्थानची चलनपद्धति त्या आपल्या पुस्तकांत म्याकलिआडने म्हटल्याप्रमाणे इंग्रजी