पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयीं सामान्य विचार.

३५


नोटांची किंमत उतरणे शक्य नाहीं. त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्रांत युद्ध चालू असतांना किंवा बाजारभाव उतरला असतांना व्यापारांत होणान्या गडबडीमुळे जर सरकारनें नोटा काढिल्या तर अशा वेळींही त्यांची किंमत उतरत नाहीं; पण लोकांना गरज नसतांना जर नोटा काढण्यांत आल्या तर त्यांची किंमत अर्था. तच उतरणार. कधीं कधीं अशा रीतीने काढिलेल्या नोटांची किंमत जर उतरा- वयास लागली तर सरकार एक युक्ती योजते. ती युक्ती म्हणजे लोकांनी सर कारदेणे ह्या नोटांचे रूपाने दिले असतां तें आपण स्वीकारूं असें सरकारनें जाहीर करणे ही होय. पण ह्या युक्तीचा परिणाम तात्पुरता होत असतो व नोटा जर थोड्या प्रमाणांत काढिल्या नसल्या तर तो परिणाम फारच थोडा असतो.

 कांही लोकांचे अर्से म्हणणे आहे कीं, आपणांस मिळालेल्या नोटांबद्दल सरकाराकडून पुढेंमागे नाणी मिळण्याचा संभव आहे असा जर लोकांचा नुसता भरंवसा असला तरी सुद्धां नोटांची किंमत उतरणार नाहीं. पण असा लोकांचा जर भरवसा असेल तर एवढेंच होईल कीं, लोक त्या नोटा सांठवून ठेवतील, पण त्यांची किंमत उतरल्यावांचून केव्हांही रहाणार नाही. कारण अर्थशास्त्राचा असा नियम आहे कीं, चलनी नाण्याची सध्यां जो वस्तू विकत घेण्याची शक्ति आहे तिजवरच ह्या नाण्याची किंमत अवलंबून रहाणार.

 वरील विवेचनाचा इत्यर्थ इतकाच आहे की, चटनी नोटा- विशेषतः ज्या नोटांबद्दल नाणी मिळावयाची नसतात अशा नोटा-प्रचारांत आणतांना फार काळजी घ्यावयास पाहिजे. धातूंची नाणीं व कागदाचे तुकडे त्यांमध्ये केव्हांहो फरक रहाणारच. सरकार जेव्हां अशा नोटा काढित असते तेव्हा त्याचा मूळ हेतु असा असतो की, आपली पत इतर राष्ट्रांत काहीं कारणांनी गेल्यामुळे आप- णांस कर्ज मिळत नाहीं; ते कर्ज बिनव्याजाने व परत न देण्याच्या बोली ने देशां- तल्या देशांत आपणांस मिळावे. पण असे करतांना आपण आपल्या प्रजेस नाइक लुबाडतो आहोत याची जाणीव सरकारास नसते व सरकारास पैसा मिळविण्याचा बिनखर्चाचा मार्ग सांपडल्यामुळे नवीन नवीन नोटा काढण्याचा मोह त्यास आवरत नाही व त्यामुळे त्या सरकारची नैतिक व राजकीय अधो-