पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
भारतीय चलनपद्धति.

गार ह्याचा अंदाज न करता आल्यामुळे व्यापारी वर्गाची प्रवृत्ति सट्टेबाजीकडे राहणार व त्यामुळे किंमतीमध्ये विलक्षण चांचल्य राहील हे उघड आहे.

 एखाद्या देशांत कागदी नोटांची किंमत किती उतरली आहे हे जर आप गास पहावयाचे असेल तर जिनसांची पूर्वीची किंमत व नोटांची किंमत उतरल्यामुळे आतां वाढिलेली जिनसांची किंमत ह्यांतील फरक काढिला म्हणजे झाले. पग आपण एक गोष्ट मात्र लक्ष्यांत ठेविली पाहिजे. तीही कीं, कागदा नोटांची किंमत उतरल्याने आपणांस ह्या नोटांऐवजी सोने घेतांना जितक्या नोडा द्याव्या लागतील त्याहून जास्त नोटा इतर जिन्नस खरेदी करतांना याव्या लागतील. ह्याची अनेक कारणे आहेत; पण मुख्य कारण असे आहे की, सोनें व इतर जिनसा ह्यांत फार फरक आहे. सोन्याची किंमत दररोज बदलूं शकते; पण इतर जिनसांची किंमत दररोज बदलू शकत नाही. तेव्हां व्यापायांची प्रवृत्ति जिन- सांच्या सोन्यांच्या किंमती किमतीपेक्षा जास्त प्रमाणांत वाढविण्याकडे असते. दुसर कारण असे आहे की, नोटांचा व जवीपेक्षां फाजील प्रमाणांत प्रचार करण्यांत आल्याने सोनें प्रचारांत न राहता ते सांठविले जाते व ते एकदम जास्त झाल्या मुळे त्याची किंमत अगोदरच उतरूं लागते व नोटांचा प्रसार फार झाल्यामुळे आपणांस जर सोने किंवा इतर वस्तु विकत घ्यावयाच्या असल्या तर पूर्वीपेक्षां आतां आपणांस जास्त नोटा याव्या लागणार. पण वर आपण पाहिलेच आहे कीं, इतर वस्तूंच्या मानाने सोनें एकदम सांठावले गेल्यामुळे त्यावी किंमत अगो- दरच थोडी उतरलेली आहे; त्यामुळे इतर वस्तु विकत घेतांना जितक्या नोटा आपणांस य व्या लागणार तितक्या नेटा तितक्यच किंमतीचे सोने विकत घेतांना द्याव्या लागगार नहत. सांगावयाचें तात्पर्य एवढेच आहे की, नोटा फार झाल्यामुळे इतर वस्तूंची नोटाच्या रूपाने व्यक्त होणारी किंमत जितकी वढते तितकी सोन्याची किंमत वाढत नाही.

 नोटा फाजील प्रमाणांत का ढेल्याने त्यांची किंमत किती उतरेल हे नक्की सांगणे शक्य नसते. व्यापाराची व उद्योगधंद्याची वाढ होत असतांना जर लोकांना चलनाची जास्त गरज असली व आहेत त्या धातूंच्या नाण्यांनी लोकांचे काम भागत नसले व अशावेळी जर नोटा काढण्यात आल्या तर अर्थात य