पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयीं सामान्य विचार.

३३


 आपण अशी कल्पना करूं की, हिंदुस्थानांतील धातूंची नाणी एकाच वेळी व एकदम प्रचारांतून काढून घेण्यांत आली व त्या नाण्यांच्याऐवजी तितक्याच किंमतीच्या कागदी नोटा सुरू करण्यांत आल्या. असा फरक केल्यानें जगांतल्या वस्तूंच्या किंमतीत कांहीं फरक होईल असे मानण्याचें कांदी कारण नाहीं. अतां आपण अशी कल्पना करूं की, ह्या प्रचारांतून काढून घेतलेल्या नाण्यांतील सोनें ह्याच धातूंची नाणों प्रचारांत असलेल्या देशांत आपण पाठवून दिलें. ह्याचा परिणाम असा होईल की, एकंदर जगांतील किंमती वाढतील व त्या मानाने हिंदुस्थानांतही जिनसा महाग होऊं लागतील. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, असें सर्व सोनें कांहीं परदेशी पाठविण्यांत येत नाहीं. नेहमींचा अनुभव असा आहे की, ज्यावेळी एखाद्या देशांत नोटा प्रचलित करण्यात येतात तेव्हां त्या नोटांच्या किंमतीचें सोनें सर्वच कांहीं बाहेर न जाता त्यांची किंमत उतरल्यामुळे कांहीं सोनें दागिने, भांडों वगैरे जिनसा बनविण्याकडे खर्च होतें. कांही सोन्याचा गुप्तसंचय होऊं लागतो व राहिलेले सोनें परदेशी पाठविले जातें. अशी स्थिति असल्यामुळे जितकें सोने कागदी नोटा सुरू करण्यात आल्यामुळे अदृश्य होतें तितक्या मागनें जिनसांच्या किंमती वढत नाहींत.

 वरील विचारसरणीवरून आपणांस असे समजून येईल की, ज्या देशांत कागदी नोटा प्रचलित असतात त्या देशांतील वस्तूंच्या किंमती कमी जास्त होण्याचीं तीन कारणे आहेत. पहिले कारण असे की, त्या देशाचा जगांतील सोन्याचांदीचीं नाणी वापरणाच्या देशांशी संबंध असल्यामुळे त्या धातूंची नागी वापरणाच्या देशांत उद्योगधंद्यांत होणाऱ्या चढउतार मुळे जर जिनसांच्या शमती कमीजास्त झाल्या तर त्याचा परिणाम कागदी नोटा वापरणाऱ्या देशा- वर घडलाच पाहिजे. कारण अर्वाचीनकाळी दळणवळणाचे मार्ग वाढल्यानें चोदों- कडे किंमती सारख्या होण्याकडे व्यापारावी प्रवृत्त दिसून येते. दुसरे कारण असे की, ह्या कागदी नोटा वापरणाऱ्या देशांत सोन्यानें व्यक्त होणारी नोटांची कंमत स रखी बदलत असल्यानें जिनसांच्या किंमतीतही सारखे फेरफार होत राहणार. तिसरें कारण असे की, त्या कागदी नोटांची किंमत पुढे किती राह-