पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
भारतीय चलनपद्धति.

आपणांस असे सांगतो कीं, अमेरिकेत जेव्हां सोनें मुबलक व थोड्या खर्चात १६ व्या शतकांत सांडूं लगले व १९ व्या शतकांत कैलिफोर्निया व आस्ट्रे. लिया येथे सोन्याच्या खाणींचा शोध लागला त्या वेळी निगचा एकंदर संग्रह खूपच वाढल्या तुळे युरोपखंडांतील वस्तूंच्या किंती एकदन चढू लागल्या.

 ह्या कारणांशिवाय वस्तूंच्या किंमती वाढण्याची दुसरीही कारणे आहेत. 'उदाहरणार्थ, जितक्या जास्त प्रमागांत पैसा-मग तो पैसा नाण्याच्या रूगंत असोवा नोटांच्या रूपांत अपो-लोकांच्या हातांत खेळ1 असतो तितक्या जास्त प्रमागांत किंमती वाढत असतात. आपण अशी कल्पना करूं कीं, एक मोटारगाडी ५ तासांत १०० मैल प्रवास करते; त्याच गाडाने जर तेवढ्याच वेळांत २०० मैला प्रवास केला तर आपणांस असे म्हणता येईल की, दोन मोटार गाड्यांत ५ तासांत १०० मैल प्रवःस केला. म्हणजे ५ ताषांत दोनशें मैल प्रवास करणारी मोटारगाडी ही ५ तासांत १०० मैल प्रवास करणान्या दोन मोटारगाड्यांच्या योग्यतेची झाली हे उघड आहे. त्याचप्रमाणे एक नाणे लोकांच्या ह तून दोनदां गेले काय व नाणी त्यांच्या हातून एकदां गेली काय, दोन्ही गोष्टी एकच होत. हा नियम जर लक्षांत ठेवला तर पूर्वीचाच नाणी जर जास्त प्रमाणांत लेक उपगंत आगूं लागले तर किंमती वाढणें सह.जेकच आहे. ह्रीं नागी लोकांनी जर जास्त प्रमाणांत आणावयाची असतील तर उद्योग- धंयाची वढ जास्त झाली पाहिजे व लोकसंख्याही बरीव पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी खेडेगांवापेक्षां शहरांत जास्त प्रमाणांत दिसून येत असल्यामुळे वस्तूंच्या किमती शहरांतच वाढलेल्या आपणांस दिसतील.

 असो. वर सांगितलेच आहे कीं, देशांत पैसा फार झाला की जिनसांच्या किंमती वाढतात. हा पैसा एकतर धातुवी नाणी जास्त पांडली गेल्याने वाढतो किंवा नोटांचा प्रसार फर व ढल्यानें होतो. ज्या वेळी उद्योगधंद्याची वाढ झाल्या- मुळे लोकांना नाण्याची जास्त गरज अउते अशा वेळी जर हा पैसा वाढला तर जिनसांच्या किंमती ची वाढ जास्त होत नाहीं. पग अशी जर परिस्थिति नसेल व नोटा सरकार स्वार्थबुद्धीनें काहूं लागल तर जिनसा हटकून महाग मिळू लागतील. त्याच मुद्याचा आपण जस्त खोल विचार करूं.