पान:भारतीय चलनपद्धती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयीं सामान्य विचार.

३१


काढावयाच्या त्याबद्दल शेख नाणे देण्याची जबाबदारी असल्य मुळे व्यापाराच्य सोयीच्या दृष्टीनें हव्या तितक्या नोटा काढणें सरकारास शक्य न हो. अतएव पेढ्यानींच नोटा काढणे इष्ट असते. मात्र पेढ्यांस नोटा क ढण्याची अनिरुद्ध सत्ता देणें केव्ही इष्ट नाही. सर्वच पंढ्या बांहों पूर्ण सचोटाच्या नसत त, व सर्वच पंढ्य लोकांन लागतील तेवढ्याच नोटा काढताल व फजील नोटा क दून आपला तळीराम गार करून घेणार नाहीत अर्धे कोणी म्हणत नाही. म्हणून पेढ्यांना नोटा काढतांना कांहीं नियम अवश्य घालून दिले पाहिजेत; पण सरका- रने स्वतः नोटा काढणे निराळे व पेढ्यांना कांहीं नियमांन्वयें नोटा काढण्यास परवानगी देणें हें वेगळें. इल्ली हिंदुस्थानांत जर आपण परिस्थिति पाहिली तर आपणांस असे दिसून येईल की, कागदी नोटा पाडण्याचा मक्ता सर्वस्वॉ सरका- रनें आपल्याकडे रखून ठेवलेला आहे. त्यामुळे घर निर्दिष्ट केलेले ते येथे दिसून येण्याचा संभव आहे. महायुद्धाचे वेळी ज्या वेळी रुपये व स व्हरिन 'दुर्मिळ होऊं लागले त्या वेळी सर्व प्रकारच्या नोटा सरकारनेच पाढिल्या होत्या; व कांहीं वेळ ह्या नोटांचा सुळसुळाट झाल्यामुळे किंमती वाढू लागल्या व मध्यमं वर्गातील लोकांचे, ठराविक पगार असलेल्या नोकरांचे व मजूरांचे अवर्णनीय हाल होऊं लागले. हल्लींसुद्धां महायुद्ध संपले तरी एकदा ज्या वस्तूंच्या किंमती चढलेल्या आहेत त्या मूळ पदावर येत नहींत व ही महागाई कायमचीच होते किंवा काय अशी लोकांस भी. वाटू लागली आहे.

 (२२) चलनी नोटा व वस्तूंच्या किंमती: -वर सांगण्यांत आलेलेच आहे कीं, नोटांचा प्रसार फाजील प्रमाणांत करण्यांत आला म्हणजे महागाई होऊं लगते. ह्याच विधानाचा आपण जरा विस्ताराने विचार करूं या. अर्थशास्त्रज्ञांचा असा एक सिद्धांत आहे की, एकाद्या देशांत मूळच च जो पैसा असतो त्याची जर दुप्पट किंवा तिप्पट केली तर इतर परिस्थिति तशीच असल्यास, वस्तूंची किंमत जी त्याच पटीनें नाहीं तरी, बऱ्याच प्रमाणांत व हूँ लागते. आपला असा अनुभव आहे की, सोनें व चाँदी ह्या धातु जेथें मुबलक असतात तेथे किंमती वाढलेल्या असतात. ज्या भागांत सोन्याचांदीच्या खाणी असतात तेथे वस्तूंच्या किंमती कल्पनेच्या बाहेर महान असतात. इतिहास

म... या. पोतदार,
ग्रंथ संग्रह